मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नवी मुंबई पालिकेची हॉस्पिटल्सवर धडक कारवाई, कोरोना परिस्थितीत होते धक्कादायक प्रकार सुरू

नवी मुंबई पालिकेची हॉस्पिटल्सवर धडक कारवाई, कोरोना परिस्थितीत होते धक्कादायक प्रकार सुरू

सध्या 639 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 356 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

सध्या 639 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 356 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही कारवाई केली.

नवी मुंबई, 26 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही नियम धाब्यावर मोडण्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेनं

3 रुग्णालयावर धडक कारवाई केली आहे.

नवी मुंबई पालिकेनं 3 खासगी रुग्णालयांवर कारवाई केली आहे.  परवानगी नसतानाही कोविड रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात  होते.  ही बाब निदर्शनास आल्यानंतर  महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही कारवाई केली.

यामध्ये शहरातील क्रीटी केअर, कुन्नूरे आणि वाशी पामबीच येथील हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही खासगी हॉस्पिटल्स बंद करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाने कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व खासगी हॉस्पिटल्स आणि रुग्णालयांसाठी नियमावली तयार करून दिली आहे. परंतु, काही खासगी हॉस्पिटल्सकडून नियम मोडीत काढले जात आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

दरम्यान,  कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण शुक्रवारी पुन्हा वाढलं आहे. शुक्रवारपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, 19 हजार 592 रुग्ण बरे झाले. तर 17 हजार 794 नवे रुग्ण आढलले आहेत. तर 416 जणांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 76 टक्यावर गेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला होता. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले होते. तर  17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.

कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी जगभरात विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनाच्या लशीवर (Corona vaccine) संशोधन सुरू आहे. पण लस येईपर्यंत सर्वात प्रभावी उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क, प्लॅस्टिक शिल्डचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करण्यात येत आहे.

First published: