'सगळ्यांदेखत त्यांनी माझी छेड काढली पण मदतीला कोणीच नाही आलं'

युरोपीयन मैत्रिणीसोबत लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एक 22 वर्षीय मणिपुरी विद्यार्थिनी सोबत छेडछाड झाल्याची घटना नवी मुंबईत समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2018 12:13 PM IST

'सगळ्यांदेखत त्यांनी माझी छेड काढली पण मदतीला कोणीच नाही आलं'

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 19 सप्टेंबर: युरोपीयन मैत्रिणीसोबत लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एक 22 वर्षीय मणिपुरी विद्यार्थिनी सोबत छेडछाड झाल्याची घटना नवी मुंबईत समोर आली आहे. 11 सप्टेंबरला ही तरूणी वाशी ते गोवंडी दरम्यान जनरल डब्यातून प्रवास करत होती. तेव्हा दोघांनी छेड काढल्याची तक्रार पीडित तरूणीनं वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात केलीय.

पीडितेनं सोशल साईटवर या घटनेची माहिती शेअर केलीये. वाशी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. जेव्हा या दोन नराधमांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कुठल्याही प्रवाशाने तिची मदत केली नसल्याची खंत पीडितेनं व्यक्त केली.

सदर विद्यार्थिनी ही 11 सप्टेंबर रोजी आपल्या युरेपीयन मैत्रिणीसोबत वाशी ते गोवंडी जनरल डब्यात प्रवास करीत होती. त्याच दरम्यान चालत्या ट्रेनमध्ये दोन जणांनी या मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढली असल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात केलीय.

Loading...

यासोबतच पीडित विद्यार्थिनीने जेव्हा या दोन नराधमांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कुठल्याही प्रवाशांनी त्यांना मदत केली नसल्याची खंत पीडितेने व्यक्त केली असून, शनिवारी पीडित विद्यार्थिनीने सोशल साईट्स वर देखील आपल्या सोबत झालेल्या या घटने संबंधीची माहिती शेअर केली होती.

वाशी रेल्वे पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून 2 अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. वाशी रेल्वे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

 

शुटींगच्या रात्री मिळाली बॉडी मसाजची ऑफर - राधिका आपटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...