सुसाईड नोट, देहराडून आणि आता अपहरण, DIG विनयभंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

सुसाईड नोट, देहराडून आणि आता अपहरण, DIG विनयभंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

मुलीसोबत असणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी देहराडूनमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

  • Share this:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 15 जानेवारी : डीआयजी निशिकांत मोरे विनयभंग प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. पीडित मुलगी 7 जानेवारीला घरातून पळून गेली नसून तिचं अपहरण झालं होतं. मुलीच्या शोधासाठी 10 अधिकारी आणि 100 पोलीस तपास करीत होते. मुलीसोबत असणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी देहराडूनमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणामध्ये निशिकांत मोरेचा सहभाग नसल्याचं सांगण्यात येत आहे. विनयभंग प्रकरणात निशिकांत मोरेला शोधण्यासाठी पथक तैनात करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या आदेशाने मोरेला नोटीस बजावण्यात येणार आहे. निशिकांत मोरेला अटक करण्यासाठी छापे टाकले मात्र तो सापडले नसल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

या प्रकरणात, बेपत्ता असलेली मुलीला मंगळवारी एक मुलासोबत देहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे ती पळून गेल्याची चर्चा होती. पण तिचं अपहरण करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यामुळे मुलीची चौकशी केल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, मुलीने सुसाईड नोट का लिहिली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

इतर बातम्या - 'जाणता राजा' वादावर शरद पवारांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा

उध्दव ठाकरेंच्या ड्रायव्हरने पीडितेच्या पालकांना धमकावलं

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवेकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला होता. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात ' शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू' अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुबीयांनी धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

इतर बातम्या - बासाहेबांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढणार, मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय

पीडित मुलीने लिहिली होती सुसाईड नोट

खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत असलेले पोलीस उप महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाली होती. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

'मी आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारा DIG निशिंकात मोरे जबाबदार आहे,' असं सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये तळोजा पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली होती. एका व्हिडीओवरून निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होती. वाढदिवस साजरा करताना विनयभंग केल्याचं अप्लवयीन तरुणीने तक्रारीत म्हटलं होतं.

नवी मुंबईत 5 जून रोजीचा हा प्रकार झाला होता. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मुलीचे कुटुंब तणावात होते. अखेर 26 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्यात मोरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.

Published by: Renuka Dhaybar
First published: January 15, 2020, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading