नवी मुंबईतील भूयार खोदून बँक लुटणाऱ्या 11 आरोपींना अखेर अटक

नवी मुंबईतील भूयार खोदून बँक लुटणाऱ्या 11 आरोपींना अखेर अटक

जुईनगरच्या बँक ऑफ बडोदातील दरोडा प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. नवी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून या आरोपींना अटक केलीय. गेल्या 13 नोव्हेंबर रोजी चक्क भूयार खोदून हा बँक दरोडा टाकण्यात आला होता. एप्रिल 2017 पासून या बँकेत दरोडा घालण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. बँकेत भुयार खोदून आरोपींनी 27 लॉकर फोडले होते.

  • Share this:

05 डिसेंबर, नवी मुंबई : जुईनगरच्या बँक ऑफ बडोदातील दरोडा प्रकरणात अकरा जणांना अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. नवी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातून या आरोपींना अटक केलीय. गेल्या 13 नोव्हेंबर रोजी चक्क भूयार खोदून हा बँक दरोडा टाकण्यात आला होता. एप्रिल 2017 पासून या बँकेत दरोडा घालण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. बँकेत भुयार खोदून आरोपींनी 27 लॉकर फोडले होते. यातून 3 कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला होता. चोरलेल्या मुद्देमालापैकी पोलिसांनी पन्नास टक्के मुद्देमाल जप्त केलाय. अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जण अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर जवळपास शंभर गुन्ह्यांची नोंद आहे.

गेल्या १३ नोव्हेंबर रोजी हा दरोडा घालण्यात आला होता. नवी मुंबईतील जुई नगरच्या सेक्टर ११ मध्ये असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा पडला होता. शनिवार आणि रविवार असल्यामुळे दोन दिवस बँक बंदर होती. १३ नोव्हेंबरला जेव्हा बँक उघडण्यात आली तेव्हा या बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानातून भुयार खणून दरोडेखोरांनी बँकेत शिरून बँक लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता.

दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम चोरून नेली होती याची माहिती त्यावेळी मिळाली नव्हती. कट रचूनच ही बँक लुटण्यात आली हे समोर आलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत होतेच. त्याच अनुषंगाने नवी मुंबई पोलीस कामाला लागले आणि या सगळ्या प्रकाराला एक महिना उलटायच्या आत बँक लुटणाऱ्या ११ दरोडेखोरांना नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले. आता ४ फरार दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

 

First published: December 5, 2017, 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading