Home /News /news /

'अद्भूत कलाकृती' तयार करणाऱ्या इंजिनीयरची देशभरात चर्चा; बांधकामाचा नमुना पाहून लोक हैराण!

'अद्भूत कलाकृती' तयार करणाऱ्या इंजिनीयरची देशभरात चर्चा; बांधकामाचा नमुना पाहून लोक हैराण!

अशी इमारत कधी पाहिली आहे का?

    जयपुर, 6 सप्टेंबर : राजस्थानची राजधानी जयपुरमधून (Jaipur Viral News) एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो कुणा सुंदर सेलिब्रिटी किंवा खेळाडूचा नाही. हा फोटो जयपूरमधील एका गावात तयार करण्यात आलेल्या दुमजली इमारतीची (Multi storey shop) आहे. हा फोटो प्रदीप शेखावत नावाच्या युजरने शेअर केला आहे. युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा जयपूरमधील इंजिनयरिंगचं अद्भूत उदाहरण असल्याचं सांगितलं आहे. शेखावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10×20 फूटांची दुकान 20×30 फूटांची झाली आहे. या फोटोवर अन्य युजर्सदेखील प्रतिक्रिया देत आहेत. शेखावत यांनी हा फोटो ट्विट करताना जयपूर विकास प्राधिकरणालादेखील टॅग केलं आहे.  (Nationwide discussion of the engineer who created the building People are annoyed by the construction pattern) हा फोटो पाहून कोणीही आश्चर्यचकित होईल. या दुकानांचा बांधकाम सध्या सुरू असल्याचं फोटोवरुन दिसत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, एक फाऊंडेशन तयार करण्यात आलं असून त्यावर दुकाने तयार करण्यात आली आहे. या दुकानांना शटर आहेत. ग्राऊंड फ्लोअर नंतर या दुकानांवर तीन मजले चढविण्यात आले आहेत. या दुकानांवर एक टेरेसप्रमाणे करीत त्यावर मजले रचण्यात आले आहेत. इमारतीचं फाऊंडेशन लहान, दुकानाचा आकारही लहान त्यानंतर वर रचले जाणारे मजले मोठे असल्याचं दिसत आहे. हे ही वाचा-VIDEO : 180 किमी प्रतितास वेगानं धावणाऱ्या कारवर झोपला तरुण; विचित्र स्टंट भोवला यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे , जयपूरमध्ये सेटबॅक न सोडता आणि परवानगी नसताना अनेक इमारतीचं बांधकाम सुरू आहे. यावर तक्रार करीत जेडीएकडून वारंवार याबाबत आवाज उठवला जात आहे. मात्र तरीही अशा प्रकारचे बांधकाम सुरूच असल्याचं दिसत आहे. मात्र अशा प्रकारच्या बांधकामाची जयपूरमधील ही पहिलीच घटना आहे. दुकानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rajasthan, Viral photo

    पुढील बातम्या