Airstike नंतरचा सर्वांत मोठा खुलासा : भारतीय मिसाईल्सनीच पाडलं आपलं हेलिकॉप्टर

या प्रकरणात एका ग्रुप कॅप्टनसह चार अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आलंय. त्यांना कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 10:02 PM IST

Airstike  नंतरचा सर्वांत मोठा खुलासा : भारतीय मिसाईल्सनीच पाडलं आपलं हेलिकॉप्टर

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : बालाकोटच्या एअरस्ट्राईकनंतर 27 फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताचं MI-17 या जातीचं एक हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. हे हेलिकॉप्टर कुणी पाडलं  त्याबद्दल शंकाही उपस्थित केल्या जात होत्या. त्याबद्दल आता मोठा खुलासा झालाय. भारताच्याच क्षेपणास्त्रांमुळे हे हेलिकॉप्टर पडलं असं आता सिद्ध झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. हवाई दलानं या घटनेच्या चौकशीसाठी जी उच्चस्तरीय समिती नेमली होती त्या समितीच्या अहवालत ही बाब पुढे आल्याचं म्हटलं जातंय. या हेलिकॉप्टरमधल्या सर्व सात जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पाच लष्करी अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आलंय.

27 फेब्रुवारीला पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारताच्या मीग विमानांनी पाकिस्तानच्या एफ-16 या अत्याधुनिक विमानांचा पाठलाग केला होता. याच दरम्यान 'MI-17' हे हेलिकॉप्टर कामगिरीवर असतानाच कोसळलं होतं. हे हेलिकॉप्टर पाकिस्तानचं समजून भारतीय क्षेपणास्त्रांनी ते पाडलं होतं.

VIDEO: 'मोदी है तो मुमकिन है' या घोषणेवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी

या प्रकरणी ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमने सखोल चौकशी करून अहवाल सादर केलाय. या प्रकरणात एका ग्रुप कॅप्टनसह चार अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आलंय. त्यांना कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी नेमकी चूक काय झाली. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी काय करता येईल याबद्दलही या अहवालत काही सूचना करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तान अभिनंदनची करणार होतं हत्या

Loading...

एअरस्ट्राईक कारवाईनंतर भारतीय हद्दीत बिथरलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान घुसखोरी केली होती. यावेळेस हवाईदलाच्या मिग-21 बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं. यानंतरही अभिनंदन हे सुरक्षित भारतात परत येऊ शकत होते. पण पाकिस्तानच्या कारस्थानामुळे त्यांना ते शक्य झालं नाही.

'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL

आपल्या हद्दीमध्ये शिरल्यानंतर पाकिस्तान आपल्या भारतीय सैनिकाला मारण्याच्या तयारीत होता. पण त्यांना जमलं नाही. अभिनंदन हे पाकच्या हद्दीत शिरताच त्यांना परत येण्याची सूचना देण्यात आली होती. पण पाकिस्तानकडून त्यांच्या कम्युनिकेशन सिस्टमलाच जाम करण्यात आलं होतं. त्यामुळे वॉर रुममधून आलेल्या सूचना अभिनंदन यांना ऐकू गेल्या नाही आणि त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावं लागलं.

'हिन्दुस्तान टाइम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिग-21 (MiG-21)मध्ये अँटी जॅमिंग टेकनिक असती तर त्यांच्यापर्यंत सूचना पोहचल्या असत्या आणि ते भारतात परत आले असते. पण यातच पाकिस्तानने रडीचा डाव खेळत अभिनंदन यांच्या विमानाची कम्यूनिकेशन सिस्टम जाम केली आणि त्यांना पाकिस्तानध्ये उतरण्यास भाग पाडलं.

गेल्या 70 वर्षांत अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट, नीती आयोगाची कबुली

14 फेब्रुवारी 2019 ला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 13 दिवसांनंतर भारतीय हवाई दलानं कुरापती पाकिस्तानविरोधात एअरस्ट्राईक केला आणि बालाकोट परिसरातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...