सोनिया-राहुल गांधींना हायकोर्टाचा दणका; नॅशनल हेराल्डप्रकरणी चौकशीचे आदेश

दिल्ली हायकोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीचे करण्याचे आयकर विभागाला आदेश दिले आहेत.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 04:00 PM IST

सोनिया-राहुल गांधींना हायकोर्टाचा दणका; नॅशनल हेराल्डप्रकरणी चौकशीचे आदेश

12 मे : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीचे करण्याचे आयकर विभागाला आदेश दिले आहेत.

नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने राहुल आणि सोनिया यांना फसवणुकीचे षड्यंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यंग इंडियाने फक्त 50 लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात डिसेंबर 2015 रोजी सोनिया आणि राहुल गांधी पटियाला हाऊस न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. त्यानंतर आज न्यायालयाने पुन्हा एकदा त्यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...