16 डिसेंबर, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात फ्लोराईडमिश्रीत पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला जिल्हाधिकारीच जबाबदार असून, त्यांना तात्काळ आमच्यासमोर हजर करा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने काढलाय. फ्लोलाईड मिश्रीत पाणी पुरवठ्यावर वेळीच पायबंद घालण्यासाठी हरित लवादाने सूचना करूनही संबंधीत जिल्हा प्रशासनाने हे आदेश गांभिर्याने न घेतल्याने राष्ट्रीय हरित लवादाने हे आदेश काढलेत. नांदेड, चंद्रपूर, परभरणी, यवतमाळ, हिंगोली, वाशीम, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, भंडारा या १२ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना अटक करून हजर करा, तो आदेश आहे. १० हजार रूपयांचा जामीनपात्र वॉरंटनुसार हे आदेश काढण्यात आलेत. हरित न्यायाधिकरणाच्या पुणे बेंचने हे आदेश काढलेत.
या बाराही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठीच्या बोअरवेलचे प्रमाण जास्त आहे. दोन बोअरवेलमधील अंतर आणि खोली यासंदर्भात नियमावली आहे. मात्र त्यांचे पालन होत नसल्याची तक्रार करत अॅड. असीम सरोदे यांनी 2013 साली हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती.
फ्लोराईडमिश्रित पाण्यासंदर्भातील आदेशांची अंमलबाजवणी न झाल्याचे जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांकडून हरित लवादाला सांगण्यात आले. शिवाय, काहीजणांनी उत्तरच दिले नाही. शिवाय, ज्यांनी उत्तरं दिली, त्यांची उत्तरं समाधानकारक नव्हती. त्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय हरित लवादाने निष्काळजीपणाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांबाबत नाराजीही व्यक्त केली
फ्लोराईडमिश्रीत पाण्यामुळे आजारपण
आजाराला हे जिल्हाधिकारी जबाबदार
नांदेड
चंद्रपूर
परभरणी
यवतमाळ
हिंगोली
वाशिम
जळगाव
जालना
लातूर
नागपूर
भंडारा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा