VIDEO: काँग्रेस आमदारावर लग्नाच्या कार्यक्रमात गळ्यावर चाकूने वार, प्रकृती गंभीर

VIDEO: काँग्रेस आमदारावर लग्नाच्या कार्यक्रमात गळ्यावर चाकूने वार, प्रकृती गंभीर

पोलिसांनी हल्लेखोर ताब्यात घेतला असला तरी हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

  • Share this:

कर्नाटक, 18 नोव्हेंबर : रविवारी रात्री एका कार्यक्रमात कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये काँग्रेसचे आमदार तनवीर सेत यांच्यावर जोरदार हल्ला झाला. फरहान नावाच्या व्यक्तीने कॉंग्रेसच्या आमदारावर धारदार चाकूने हल्ला केला. यानंतर जखमी आमदारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी हल्लेखोर ताब्यात घेतला असला तरी हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

आमदार तनवीर सेतवरील हल्ल्याची माहिती कळताच म्हैसूरचे पोलीस आयुक्त टी. बालकृष्ण देखील रुग्णालयात पोहोचले. हल्लेखोर 20 वर्षांचा फरहान असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, तनवीर यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

इतर बातम्या - मुंबई: मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, 12 तास सामूहिक बलात्कार

तनवीर यांच्यावर हल्ल्या झाल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थक रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयाच्या सभोवतालची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, याआधीही केदारनाथमधील काँग्रेस आमदार मनोज रावत यांच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. उत्तराखंड राज्य स्थापना दिनानिमित्त घडलेल्या या घटनेने पोलिसा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  उपस्थित केले गेले.

मोठी बातमी - सोनिया गांधींच्या बैठकीनंतर पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले..

या घटनेचा कॉंग्रेसने तीव्र निषेध केला होता. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोर उपाध्याय म्हणाले की, माझा छोटा भाऊ आणि केदारनाथचे आमदार मनोज रावत यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलीस याची तात्काळ चौकशी करतील असं ते म्हणाले होते.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 18, 2019, 8:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading