धनंजय मुंडे शेतकऱ्यांना देणार फक्त 10 रुपयात जेवण, ही आहे योजना

धनंजय मुंडे शेतकऱ्यांना देणार फक्त 10 रुपयात जेवण, ही आहे योजना

विधानसभा निवडणुकांच्या आधी धनंजय मुंडे यांनी हा सामाजिक उपक्रम सुरू केल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालीय.

  • Share this:

सुरेश जाधव, 16 ऑगस्ट : परळी शहरात कामानिमित्त येणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना आता केवळ 10 रूपयात जेवण मिळणार आहे. नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवल्या जाणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहाचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत हे भोजन गृह सुरू करण्यात आलंय. परळीत धान्य खरेदी, विक्री, शेतीविषयक व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी येणार्‍या शेतकर्‍यांना या भोजन गृहात 10 रूपयांमध्ये जेवणाचा लाभ घेता येणार आहे.

नाशिक बाजार समितीला ग्रहण, सभापतीला लाच घेताना अटक

विधानसभा निवडणुकांच्या आधी धनंजय मुंडे यांनी हा सामाजिक उपक्रम सुरू केल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालीय. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळवुन त्यांना आधार मिळावा हा उद्देश असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू केलाय.

शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार निवेदन

या उपक्रमात जेवणासाठी येणार्‍या शेतकर्‍यांकडून फक्त 10 रूपये तर उर्वरित खर्च नाथ प्रतिष्ठान करणार आहे. आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी झिजणार्‍या स्व.पंडीतअण्णा मुंडेंच्या स्मृती या योजनेच्या माध्यमातून कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून ती कायमस्वरूपी चालवली जाईल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.

आदित्य ठाकरेंना भाजपच्या नगरसेवकांनी रोखले, मतभेद चव्हाट्यावर

राज्यातल्या इतर भागात समाधानकारक पाऊस असला तरी मराठवाड्यात मात्र पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अनेक ठाकाणी तर अगदी तुरळकच पाऊस झाला. त्यामुळे पीक हातातून जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. मराठवाड्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग होत असला तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या