• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • नाशिकमधील गोदावरीचा पूर ओसरला, दुतोंड्या मारुती पाण्याबाहेर

नाशिकमधील गोदावरीचा पूर ओसरला, दुतोंड्या मारुती पाण्याबाहेर

नाशिकमधील पूरस्थिती लक्षात घ्यायची असेल तर दुतोंड्या मारूती त्याचा मापदंड मानला जातो.

  • Share this:
नाशिक, 15 जुलै: नाशिकमध्ये गोदावरीला नदीला आलेला पूर आता ओसरलाय. धरण क्षेत्रातला पावसाचा जोर कमी झाल्याने नदीच्या पुराचं पाणीही कमी झालंय, गंगा घाटावरील नदीच्या किनाऱ्यावरचा दुतोड्या मारुती आता पाण्याबाहेर आलाय. काल गोदावरीच्या पुराचं पाणी मारूतीच्या कमरेपर्यंत चढलं होतं. नाशिकमधील पूरस्थिती लक्षात घ्यायची असेल तर दुतोंड्या मारूती त्याचा मापदंड मानला जातो. अख्खा मारुती जर पाण्यात बुडाला तर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली असं सांगितलं जातं. यापूर्वी 1972च्या पुरात दुतोंड्या मारूती पुराच्या पाण्यात अख्खा बुडून पुराचं पाणी नारो शंकराच्या मंदिरावरील घंटेला लागलं होतं. अशी आठवण गोदावरीला पूर आला की आवर्जून सांगितली जाते. नाशिक शहरातही आता पावसाचा जोर कमी झालाय. गेल्या 24 तासात शहरात 71 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात 757 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण 64 टक्के भरल्याने धरणातून 50 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय. त्याचा मराठवाड्याला फायदा होणार आहे.
First published: