दिंडोरी विषबाधा प्रकरणी केटरर्स चालकास अटक

दिंडोरी विषबाधा प्रकरणी केटरर्स चालकास अटक

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 250 शेतकऱ्यांना विषबाधा झाली, यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अतुल केदार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेचं कारण हलगर्जीपणा आहे. या प्रकरणात केटरर्स चालकास अटक करण्यात आलीय. केटरिंग कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Share this:

नाशिक, 09 नोव्हेंबर : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात 250 शेतकऱ्यांना विषबाधा झाली, यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अतुल केदार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेचं कारण हलगर्जीपणा आहे. या प्रकरणात केटरर्स चालकास अटक करण्यात आलीय. केटरिंग कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पेठरोडवरील उमराळे बुद्रुक येथे रमेश मनोहर धात्रक यांच्या वस्तीवर बायर सीड कंपनीनं बुधवारी संकरित टोमॅटो पीकपाहणी चर्चासत्र आयोजित केलं होतं. हे चर्चासत्र दुपारी १ वाजता संपल्यानंतर उपस्थित सुमारे २५० शेतक-यांनी येथे जेवण केलं. काही वेळानं त्यातील काही शेतक-यांना मळमळ, उलटीचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. यातील अतुल केदार या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, प्रांत उदय किसवे, तहसीलदार गाढवे, कैलास मवाळ, माधवराव साळुंखे यांनी रुग्णालयात धाव घेतली. सध्या रुग्णालयात प्रमोद अपसुंदे, रामचंद्र मेधने, रामू अपसुंदे, शांताराम अपसुंदे, राजेंद्र केदार, स्वप्नील केदार, राजेंद्र थेटे, नीलेश नागरे, उत्तम केदार, अंकुश केदार, मंगेश कदम, बबलू गवारे यासह 28 शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहे. यातील विषबाधा झालेल्या चार रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे़ या रुग्णांमध्ये छबाबाई धोंडीराम कडाळी, किसन सुखा कडाळी, बाळू लक्ष्मण जाधव आणी मनीषा सुनील कडाळी यांचा समावेश आहे. काही रूग्णांना शहरातील अपोलो हॉस्पिटल, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय. रात्री उशीरा नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल ४० तर दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात १२ शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहे.

First published: November 9, 2017, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading