नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर वजन जास्त झाल्याने पुन्हा लॅन्ड करावं लागलं !

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर वजन जास्त झाल्याने पुन्हा लॅन्ड करावं लागलं !

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर पुन्हा थोडक्यात बचावलंय. हेलिकॉप्टरमधील वजन जास्त झाल्याने मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर टेकऑफ करताच पुन्हा लॅन्ड करावं लागलं. अखेर त्यांचा खानसाम सतीशला उतरवल्यानंतर हेलीकॉप्टरने पुन्हा टेकऑफ केलं

  • Share this:

09 डिसेंबर, नाशिक : नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर पुन्हा थोडक्यात बचावलंय. हेलिकॉप्टरमधील वजन जास्त झाल्याने मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर टेकऑफ करताच पुन्हा लॅन्ड करावं लागलं. अखेर त्यांचा खानसाम सतीशला उतरवल्यानंतर हेलीकॉप्टरने पुन्हा टेकऑफ केलं, हेलीकॉप्टर मधून मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन आणि स्वीय सचिव औरंगाबादला रवाना झालेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर औरंगाबादमध्ये नुकतंच सुखरूप लॅन्ड झाल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडलाय.

पण मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अशा घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही गडचिरोली नंदूरबार, अलिबाग आणि लातूरमध्येही मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. त्यामुळे या विषयाची गंभिरता प्रशासन लक्षात घेत नाही का ? असाच सवाल उपस्थित होतोय आजही नाशिकमध्ये केवळ वजन जास्त झाल्याने हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग करावं लागलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षित हवाई प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. तसंच मुख्यमंत्र्यांसारख्या व्हिव्हिआयपींचं हेलिकॉप्टर टेकऑफ करताना सेफ्टीमेजर्स घेतले जात नाहीत का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 11:51 AM IST

ताज्या बातम्या