भांडणाच्या रागातून तरुणाला भर बाजारातच संपवलं, चाकूने केले सपासप वार

भांडणाच्या रागातून तरुणाला भर बाजारातच संपवलं, चाकूने केले सपासप वार

विनोद बाजारात आलेला असताना 8 जणांचं टोळकं तिथे आलं. त्यांनी विनोदशी भांडायला सुरुवात केली आणि चाकूने त्याच्यावर सपासप वार केले.

  • Share this:

नाशिक 16 फेब्रुवारी : नाशिक जवळचा घोटीचा गुरांचा बाजार हा सर्व देशभर ओळखला जातो. अनेक राज्यांमधून तिथं गुरं विक्रिसाठी आणली जातात. या बाजारातच खून झाल्याने सगळा परिसरच हादरुन गेलाय. घोटीत डांगी जनावरांचा बाजार भरतो. यात शेकडो नागरीक समोर असताना विनोद तोकडे(वय 20) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री साडेनऊ वाजताची ही घटना आहे. या प्रकरणात 8 आरोपी सहभागी होते. यातल्या 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलंय.

पाच दिवसांपूर्वी एका हॉटेलवर दोन गटामध्ये वाद झाले होते आणि याच वादावरून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. विनोद आणि काही तरुणांचं हॉटेलमध्ये भांडण झालं होतं. त्याचा राग या तरुणांना आला होता. त्यानंतर पाच दिवसांचा अवधी गेला. त्या काळात त्यांनी विनोदच्या हालचालींची माहिती काढली असं बोललं जातंय.

गर्भवती पत्नीसोबत संभोग सुरू असतानाच पतीने गळ्यावर फिरवला ब्लेड

विनोद हा घोटीच्या गुरांच्या बाजारात येणार असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यांनी तोच डाव साधला. विनोद बाजारात आलेला असताना 8 जणांचं टोळकं तिथे आलं. त्यांनी विनोदशी भांडायला सुरुवात केली आणि चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

त्यानंतर लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

भर रस्त्यात प्रियकराने घातल्या प्रेयसिला गोळ्या, नंतर त्याच केली आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नंतर त्यांनी 7 आरोपींना अटक केली. एका आरोपीला शोधण्याचं काम सुरु असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2020 03:42 PM IST

ताज्या बातम्या