जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

खरंतर 19 वर्षीय अजिंक्यला शरीर सौष्ठवमध्ये नाव कमवायचं होतं. पण दुर्दैवाने व्यायाम करतानाच त्याचा अंत झालाय.

  • Share this:

17 जून : जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीये. अजिंक्य लोळगे असं या तरुणाचं नाव आहे.

नेहमीप्रमाणे अजिंक्य जिममध्ये व्यायाम करण्यासाठी आला होता.  वर्कआऊटसाठी पुशअॅप मारल्यानंतर थोडावेळ बाजुला उभा राहिला. पण काही कळायच्या आता त्याला चक्कर आली आणि तो जागीच कोसळला. त्याला तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डाॅक्टरांनी मृत घोषित केलं. खरंतर 19 वर्षीय अजिंक्यला शरीर सौष्ठवमध्ये नाव कमवायचं होतं. पण दुर्दैवाने व्यायाम करतानाच त्याचा अंत झालाय.

First published: June 17, 2017, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading