नाशिकच्या महिला पोलीस अधीक्षकांनी 'झिंगाट' गाण्यावर धरला ठेका, आरती सिंह यांचा VIDEO VIRAL

नाशिकच्या महिला पोलीस अधीक्षकांनी 'झिंगाट' गाण्यावर धरला ठेका, आरती सिंह यांचा VIDEO VIRAL

आरती सिंह नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलिस अधीक्षक आहेत. त्यांनी याआधी औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक म्हणून कार्यभार पाहिला आहे.

  • Share this:

नाशिक, 14 मार्च : महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात रंगपंचमीच्या निमित्तानं गाणी लावण्यात आली होती. रंगपंचमी खेळली जात होती. याच आनंदात महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या तुफान डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रंगपंचमीच्या निमित्तानं सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर मनसोक्त डान्स केला. कामाचा ताण आणि थकवा विसरून मोठ्या उत्साहात ह्य़ा सर्वांमध्ये झिंगाट गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळाल्या आहेत.

नाशिक महिला ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. कामाच्या व्यापातून आणि कामाचा ताण असतानाही त्यांनी काही वेळ महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत डान्स केला आहे. पोलिसांच्या वर्दीतील डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहेत डॉ. आरती सिंह

नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलिस अधीक्षक आहेत. त्यांनी याआधी औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक म्हणून कार्यभार पाहिला आहे. नाशिक जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत संजय दराडे यांना पोलिस उपमहानिरीक्षक विक्रीकर (वस्तू व सेवा कर), मुंबई या पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या जागी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

First published: March 14, 2020, 1:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading