आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !

आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !

पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढलाय.

  • Share this:

नाशिक, 13 जुलै : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडेंना आंबा खाण्याचं वक्तव्य अखेर भोवलंय.  पीसीपीएनडीटी समितीने संभाजी भिडेंना दोषी ठरवलंय. आता ही समिती न्यायालयात जाणार आहे.

ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ- संभाजी भिडे

माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं वक्तव्य संभाजी भिंडेंनी केलं होतं. या प्रकरणी  पीसीपीएनडीटी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने चौकशी करून संभाजी भिडेंना दोषी ठरवलंय.

पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत असलेल्या सेक्शन 22 चा भंग झाल्याचा समितीने निष्कर्ष काढलाय. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आता  समिती न्यायालयात दाद मागणार आहे. त्यामुळे भिडे गुरुजींवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

 'आधी संभाजी भिडेंना अटक करा... मग कामकाज करु'

दरम्यान,  भिडे गुरूजींनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं . 'गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता,' असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे नागपूर हिवाळी अधिवेशनातही पडसाद उमटले. विरोधकांनी भिडे गुरुजींच्या अटकेची मागणी लावून धरलीये.

पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

First published: July 13, 2018, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading