शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ, लाच प्रकरणात नाशिकच्या एनडीएसटीच्या अध्यक्षाला अटक

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ, लाच प्रकरणात नाशिकच्या एनडीएसटीच्या अध्यक्षाला अटक

या दोघांनी तक्रारदाराला सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी आणि नियमित पगार काढून देण्याच्या मोबदला मागितला होता

  • Share this:

नाशिक, 02 जुलै :  माध्यमिक शिक्षक सोसायटीचे  चेअरमन  रामराव बनकर यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. सातवा वेतन आयोग फरक प्रकरणात रामराव बनकर यांचा सहभाग असलेल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

नाशिक डिस्ट्रीक्ट सेकेंडरी टिचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचिंग एम्लाई को-ऑप. सोसायटी (एनडीएसटी) चे अध्यक्ष रामराव बनकर

यांना बुधवारी अटक करण्यात आली. मागील महिन्यात नाशिकमध्ये दोन व्यवस्थापकांना 19 हजार 715 रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. यात शरद जाधव आणि जयप्रकाश कुवर या दोघांना अटक करण्यात आली होती.

मृत्यूचं तांडव! एका क्षणात जमिनीखाली दबून 50 मजूरांचा मृत्यू

या दोघांनाही तक्रारदाराकडून 19 हजार 715 रुपयांची लाच मागितली होती. या दोघांनी तक्रारदाराला सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी आणि नियमित पगार काढून देण्याच्या मोबदला मागितला होता. त्यानुसार, सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली होती.

आत्महत्येसाठी 3 मुलांसह महिलेची रेल्वे ट्रॅकवर उडी, फक्त वाचलं 1 वर्षांच बाळ

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद जाधव, जयप्रकाश कुवर यांची चौकशी केली असताना रामराव बनकर यांचा सहभाग असल्याचं समोर आलं.  तपासात रामराव बनकर यांचं मोबाईलवरील संभाषणाचा पुरावा एसीबीच्या हाती लागला. त्यानंतर  बनकर यांचा या लाचखोरी प्रकरणात सहभाग असल्याचं झालं उघड झाले. अखेर आज, लाचलुचपत विभागाने  बनकर यांना बेड्या ठोकल्यात. या प्रकरणाचा अधिक तपास अधिकारी करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 12:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading