नाशिकमध्ये नवं समीकरण... भाजपसोबत पुन्हा एक ठाकरे?

नाशिकमध्ये नवं समीकरण... भाजपसोबत पुन्हा एक ठाकरे?

शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपने मनसेसोबत घरोबा केला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,20 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीनंतर कोणताही राजकीय पक्ष राज्यात सत्ता स्थापना करू शकला नाही. परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेवरून राजकारणात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचे वाजले आहे. त्यामुळे निवडणुकीआधी बॅकफूटवर असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता केंद्रस्थानी आले आहेत. शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करेल, अशी चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, नाशिक महापालिकेत भाजप-मनसे असे नवे समीकरण समोर येताना दिसत आहे. शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपने मनसेसोबत घरोबा केला आहे. मनसेसोबत असल्याचा दावा भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी केला आहे. मनसे कार्यालयात काल मंगळवारी भाजप-मनसे नेत्यांची बैठक झाली होती. तसेच नाशकात महाशिवआघाडीसोबत मनसे नाही, हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुले भाजपसोबत पुन्हा एक ठाकरे (राज) येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र..

नाशिक महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचा दावा काँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी केला आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचे शाहू खैरे यांनी सांगितले आहे.

काँग्रेसने भरला महापौर-उपमहापौर पदाचा अर्ज...

काँग्रेसने भरला महापौर-उपमहापौर पदाचा अर्ज भरला आहे. राहुल दिवे यांचा महापौर पदासाठी तर शाहू खैरे यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे. मात्र, मनसेच्या भूमिका किंगमेकरची असून मनसेने भाजपसोबत घरोबा केल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

नाशिक महानगरपालिका महापौर निवडणूक..

- महापौर पदासाठी 2 वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत

- नवे जुने वाद विसरून उमेदवारी दाखल करण्याचा वरिष्ठांच्या सूचना

- भाजपकडून महापौरसाठी सतीश कुलकर्णी, शशिकांत जाधव, दिनकर आढाव आणि भीखुबाई दाखल यांनी अर्ज दाखल करण्यासाठी सूचना

- उपमहापौरसाठी गणेश गीते, अलका आहेर, अरुण पवार यांना सूचना

- शिवसेनेकडून अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे यांना अर्ज दाखल करण्यासाठी सूचना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या