News18 Lokmat

नाशिक महापालिकेच्या सात आजी-माजी अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितते प्रकरणी चार माजी अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित, तर तिघांवर जाणूनबुजून हायकोर्टाचा निर्णय लपवून ठेवल्याचा आरोप.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2018 08:34 PM IST

नाशिक महापालिकेच्या सात आजी-माजी अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

नाशिक, 12 ऑक्टोबर : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे महानगरपालिकेचे 7 आजी-माजी अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. निविदा प्रक्रियेत झालेल्या अनियमितते प्रकरणी चार माजी अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले असून, आयुक्तांनी त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव ठेवला आहे. तर दुसरीकडे, 'ग्रीनफिल्ड लॉन्स' बेकायदा भिंत प्रकरणी 3 विद्यमान बड्या अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित झालेत. हायकोर्टाचा निर्णय जाणूनबुजून लपवून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

नाशिक महानगरपालिकेचे सात आजी-माजी अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. माजी शहर अभियंता यु. बी. पवार, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, माजी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र भंडारी यांच्यासह उपमुख्य लेखाधिकारी सुरेखा घोलप यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. या चौघांवर नियंत्रण हीनता, निविदा प्रक्रियेत अनियमितता, 'ना हरकत' दाखल्यात तफावत, अग्निसुरक्षा निधीत गोंधळ, सेवा शुल्क आकारणीत गडबड असे आरोप आहेत. त्यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव आयुक्त तुकाराम मुंडे यांचा दाखल केलाय.

तर, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास बहिरम, नगररचना कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण या पालिकेच्या या तीन बड्या अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित झाले आहेत. या तिघांवर उच्च न्यायालयाचा आदेश हेतुपुरस्सर लपवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. त्यांच्या या चुकीमुळं नाशिक पालिकेला 16 लाख 28 हजाराचा भुर्दंड सहन करावा लागला असल्याची माहिती सुत्रांनी न्यूज18 लोकमतला दिली.

 VIDEO : ....आणि हा 'बच्चू' पोहायला लागला; कासवावरही फिजिओथेरपीची जादू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 08:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...