नाशिक, 28 जानेवारी : तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. अखेर उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला असून सेनेच्या बाजूने निकाल लागला आहे. सत्ताधारी भाजप सरकारला यामुळे मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात यावी. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या आता एक अंकाने वाढणार आहे.
हे ही वाचा-BREAKING : मुंबईतील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त; तिघांना अटक
नाशिक महापालिकेत भाजपचे सर्वाधित नगरसेवक असले तरी नाशिक रोडच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भाजपचं संख्याबळही घटन होतं. तौलनिक संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा केला जात असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपचे आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा शिवसेनेने केला होता. यानंतर शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त