धक्कादायक! महाराष्ट्रातील या शहरात चक्कर आल्याने एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

धक्कादायक! महाराष्ट्रातील या शहरात चक्कर आल्याने एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

शहरात एकाच दिवशी 9 जणांचा चक्कर आल्याने मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नाशिक, 16 एप्रिल : कोरोनामुळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली असून आरोग्य व्यवस्था मोडकळीस आली आहे. रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन अशा आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत. अशातच नाशिकमधून आणखी एक धक्कादायक माहिती (Shocking News From Nashik) समोर आली आहे. शहरात एकाच दिवशी 9 जणांचा चक्कर आल्याने मृत्यू झाला आहे.

चक्कर आल्याने नाशिक शहरात गुरुवारी 9 जण दगावले. दोन दिवसांपूर्वी देखील एकाच दिवसात चक्कर आल्याने 4 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चक्कर येऊन मृत्यू झालेल्यांची संख्या 3 दिवसात 13 जणांवर पोहोचली आहे. नाशिकमधील या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - मागील 24 तासांत देशात 2,16,850 नव्या रुग्णांची नोंद; महाराष्ट्राची स्थिती बिकट

या पार्श्वभूमीवर चक्कर येणे, मळमळ होणे यासह कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा सल्ला शहरातील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. या मृत्यूंमागे वाढत्या तापमान हे कारण आहे की आणखी कोणत्या घटकामुळे अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी खबरदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

काय आहे नाशिकमधील कोरोना स्थिती?

नाशिक जिल्ह्यात कोरोनाची दाहक वाढ कायम आहे. जिल्ह्यात 24 तासांत कोरोना बाधितांच्या संख्येत 5067 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4205 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 24 तासात 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही बळींची आतापर्यंतची उच्चांकी संख्या आहे. अवघ्या 4 दिवसात नाशिकमध्ये कोरोनामुळे 200 बळी गेले आहेत. जिल्ह्यात बळींची एकूण संख्या 2816 पर्यंत पोहोचली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: April 16, 2021, 11:14 AM IST

ताज्या बातम्या