News18 Lokmat

"भिडेंचं नाव तोंडी काढू नकोस, नाहीतर दाभोलकर करू", भुजबळांनी जीवे मारण्याची धमकी

या पत्रामध्ये आपण जर मनुस्मृतीला विरोध केला तर दाभोळकर आणि पानसरे न प्रमाणेच तुमची दशा करू अशी धमकी या निनावी पत्र देण्यात आली

News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2018 03:56 PM IST

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 28 आॅक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.  नाशिकच्या भुजबळ फार्म हाऊसवर एक पत्र मिळाले असून यात संभाजी भिडे यांचं नाव तोंडी काढल्यास तुमचा देखील दाभोळकर-पानसरे करू अशी धमकी या पत्रात दिली आहे.

नाशिकचा भुजबळ फार्म हाऊसवर मिळालेल्या या पत्रामध्ये 'आपण जर मनुस्मृतीला विरोध केला तर दाभोळकर आणि पानसरे न प्रमाणेच तुमची दशा करू' अशी धमकी या निनावी पत्र देण्यात आली आहे. पत्र मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी यांनी तात्काळ पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन घटनेचा तपशील दिला आहे.

दुसरीकडे पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पत्र पाठवणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल असं पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील  यांनी आश्वासन दिलं.

गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यात सभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांना मिळालेल्या या निनावी पत्राच्या बाबत पोलीस देखील गांभीर्याने तपास करत आहेत.

Loading...

काय धमकी देण्यात आली पत्रात...

"मागील अनेक दिवसांपासून तू परम पूजनीय भिडे गुरूजींबद्दल चुकीची भाषा वापरतो आहेत. आम्ही म्हटलं एकदा बोलला...जाऊ द्या...दोनदा बोलला...जाऊ द्या...पण XXX निच माणसा...तुला काय कळणार गुरूजींचे कार्य, परम पुजनीय गुरुजींची ताकद...

तू काय सांगतोस आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज...आम्हाला आमचे गुरूजी सांगणार तोच आमचा इतिहास आणि तेच आमचं भविष्य...

मागे वळून पहा एकदा कालकोठडीचा प्रवास...तुला तिथेच राहवयास पसंत असावे आणि म्हणून काय तू आमच्या दैवातास असे बोलतोय...

कसाबसा मरता मरता वाचलायस...राहिलेले खोटे फार अनमोल दिवस घर परिवरासह मौज मजेत घालवं. कशाला आमच्या नादी लागतोय..

हा धमकी वजा इशारा आहे तुला, शहाणा असशील तर इथून पुढे तू आमच्या गुरुजीबद्दल बोलणार नाहीस आणि जर तू तसे बोललास तर तू पुढील परिणामांसाठी सज्ज रहा...कारण आम्ही शिवप्रतिष्ठानचे धारकरी आहोत. तुझा सोक्षमोक्ष लावण्यास आम्हास काय तो वेळ लागणार...

आणि तुझ्या पुतण्या समीर त्याला तर खूप माज आहे, त्याच्याकडे सुद्धा आम्ही बघणार आहोत. स्वत:च उरलेलं आयुष्य जगून घे आमच्या नादी लागू नकोस एवढंच..पुन्हा एकदा सांगतो...भिडे गुरुजींचे वाक्य तुझ्या तोंडातून काढू नकोस नाहीतर तुमचा दाभोळकर-पानसरे झालाय समज...."

===================================

VIDEO : गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडून महापौरांना जोरदार कानपिचक्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 28, 2018 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...