Home /News /news /

NCP नेता संजय शिंदे यांच्या कार अपघाताचं धक्कादायक सत्य, सॅनिटायझरमुळे भडकली आग

NCP नेता संजय शिंदे यांच्या कार अपघाताचं धक्कादायक सत्य, सॅनिटायझरमुळे भडकली आग

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर द बर्निग कारची अंगावर थरकाप उडणारी घटना घडली आहे.

    चांदवड, 15 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या कारला चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर 13 ऑक्टोबरला आग लागली होती. महामार्गावर द बर्निंग कारचा थरार झाला होता. ही आग खूप जास्त भडकल्यामुळे संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीतली आग ही सॅनिटायझरमुळे भडकली असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय चंद्रभान शिंदे (वय 55 रा.साकोरे मिग) हे MH-15,FN- 4177 या मारूती सुझुकी सियाझ (maruti suzuki ciaz) त्यांच्या कार ने साकोरा येथून नाशिककडे जात असताना साकोरा फाट्याजवळ धावत्या कारने पेट घेतला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जात होतं. या आगीचा मोठा भडका उडण्याचं कारण सॅनिटायझर होतं. गाडीत असलेल्या सॅनिटाझरमुळे आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि गाडी लॉक झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हे वाचा-500 मीटर गाडीच्या बोनेटवर लटकत होता ट्रॅफिक पोलीस, चालकानं मारला ब्रेक आणि... नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर द बर्निग कारची अंगावर थरकाप उडणारी घटना घडली आहे. कारमध्ये अडकल्यामुळे चालकाचा जागेवर जळून कोळसा झाला आहे. या कारमध्ये मृत संजय शिंदे यांची पत्नी विमल शिंदे या साकोरा मिग येथील उपसरपंच आहेत. त्यांच्या जाण्याने साकोरा मिग गावावर शोककळा पसरली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या