तब्बल 71 धार्मिक स्थळं येत्या महिन्याभरात पालिका करणार जमीनदोस्त

तब्बल 71 धार्मिक स्थळं येत्या महिन्याभरात पालिका करणार जमीनदोस्त

उच्च न्यायालयाच्या आदेशानं शहरातील 647 धार्मिक स्थळं अनधिकृत ठरवण्यात आली असून ही कारवाई रोखण्यासाठी धार्मिक स्थळ बचाव समितीनं संघर्षाचा पवित्रा घेतल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद जन्माला आला आहे.

  • Share this:

नाशिक, 06 मार्च : नाशिक शहरातील सर्वधर्मीय 71 धार्मिक स्थळं येत्या महिन्याभरात पालिका जमीनदोस्त करणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानं शहरातील 647 धार्मिक स्थळं अनधिकृत ठरवण्यात आली असून ही कारवाई रोखण्यासाठी धार्मिक स्थळ बचाव समितीनं संघर्षाचा पवित्रा घेतल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद जन्माला आला आहे.

धार्मिक स्थळ बचाव समितीची बुधवारी झालेली बैठक चांगलीच वादळी ठरली. फेर सर्वेक्षणानंतर महापालिकेनं प्रसिध्द केलेल्या अधिकृत आणि अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्यानं हा वाद पुन्हा एकदा न्यायालयाच्या दारात नेण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

शहरातील 647 धार्मिक स्थळं अनधिकृत

एकीकडे, महापालिकेनं शहरातील धार्मिक स्थळांवरील कारवाई नियमाप्रमाणे केली नसल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयानं नव्यानं फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेनं केलेलं सर्वेक्षण चुकीचं असल्याची थेट भूमिका या बैठकीत महापौरांनी मांडली.

महापालिकेने प्रसिध्द केलेल्या यादीत ८८९ धार्मिक स्थळांचे फेर सर्वेक्षण करण्यात आलं असून, तब्बल ६४७ धार्मिक स्थळं अनधिकृत ठरवली आहेत. त्यापैकी २००९ नंतरच्या ७१ धार्मिक स्थळांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. पुरातन व मान्यताप्राप्त असलेली २४२ धार्मिक स्थळे या कारवाईतून बचावली असून, नियमित होणार आहेत. तर ५७६ धार्मिक स्थळांवरील कारवाईबाबत हरकती आणी सूचनांसाठी महिनाभराची मुदत दिली आहे. परंतु, याच यादीत त्रुटी असल्याचा आरोप मंदिर विश्वस्तांनी केलाय.

नाशिक ही पौराणिक, अध्यात्मिक आणि मंदिरांची नगरी म्हणून ओळख दर 12 वर्षांनी कुंभमेळा होत असल्यानं शहराच्या सर्व भागात देवस्थानांची संख्या मोठी आहे जर हा प्रश्न सामोपचारानं सुटला नाही तर संघर्ष अटळ मानला जातो आहे.

यादी प्रसिध्द होताच उच्च न्यायालयात पुन्हा जाण्याचं या बैठकीत निश्चित झालं असलं तरी पालिका प्रशासनानं कारवाई केली तर त्याला कडा विरोध करण्याची ठाम भूमिका या सर्वधर्मीय धार्मिक स्थळ बचाव विश्वस्तांनी घेतल्यानं येत्या दिवसात हा तिढा अधिक वाढणार हे निश्चित.

आज सर्वाधिक चर्चेत राहिलेले हे 5 VIDEO तुम्ही पाहिले का?

First published: March 6, 2019, 11:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading