Chandrayaan 2: नासाने प्रसिद्ध केला विक्रमच्या लँडिंग साइटचा फोटो, ऑक्टोबरपर्यंत मिळणार खुशखबर!

Chandrayaan 2: नासाने प्रसिद्ध केला विक्रमच्या लँडिंग साइटचा फोटो, ऑक्टोबरपर्यंत मिळणार खुशखबर!

विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगाने खाली आला. विक्रमचं कोणतंही चित्र नासाने अद्याप जाहीर केलेलं नाही.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने भारताच्या महत्वाकांक्षी मिशन चंद्रयान -2 मधील लॅन्डर विक्रमच्या लँडिंग साइटची छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. विक्रमचं चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झालं असं नासाने म्हटलं आहे. म्हणजेच विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगाने खाली आला. विक्रमचं कोणतंही चित्र नासाने अद्याप जाहीर केलेलं नाही. पण त्याने असं आश्वासन दिलं आहे की, ऑक्टोबरमध्ये तो आणखी काही छायाचित्रे प्रसिद्ध करू शकेल. नासाची उच्च रिझोल्यूशन प्रतिमा त्याच्या चंद्र ऑर्बिटर कॅमेर्‍याद्वारे कॅप्चर केली गेली आहे.

नासाच्या शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रावर रात्री आहे. ज्यामुळे बहुतेक पृष्ठभागावर फक्त छाया दिसू शकते. अशा परिस्थितीत लँडर एखाद्या सावलीत आणि धूळीमध्ये लपला असावा.

का नाही दिसला लँडर विक्रम?

नासाच्या म्हणण्यानुसार, लूनर ऑर्बिटर LRO (The Lunar Reconnaissance Orbiter) 17 सप्टेंबर रोजी लँडिंग साइटवरून गेला आणि त्याने बरीच छायाचित्रे काढली. पण, छायाचित्रांमध्ये लँडर विक्रम कुठेही दिसला नाही. नासाने म्हटलं की, ज्या वेळी ऑर्बिटर कक्षेत फिरत होता त्यावेळी तिथे संध्याकाळ होती. त्यामुळे त्याने काढलेले फोटो धुसर आहेत. त्यावेळी लँडर विक्रम सावलीत लपला असावा. ऑक्टोबरमध्ये चंद्रावर उजेड होईल, त्यानंतर विक्रमला शोधता येईल, असं नासाचं म्हणणं आहे.

केवळ एक दिवसांचे होते विक्रमचे जीवन

आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान -2 ने अनेक अडथळे पार केले.

इतर बातम्या- 'या' आठवड्यात होणार परतीच्या पावसाला सुरुवात, तोपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार

विक्रम लँडरशी संपर्क नाही, तरी चांद्रयान 2 संदर्भात आली ही चांगली बातमी

ISRO ची महत्त्वाकांक्षी चांद्रयान 2 (Chandrayaan 2)  ही मोहीम अखेर विक्रम लँडरशी संपर्काविनाच पुढे जाणार. विक्रम लँडरशी (Lander Vikram) संपर्क होण्याची आशा आता जवळजवळ संपुष्टात आली असली, तर या मोहिमेशी संबंधित एक चांगली बातमी आली आहे. इस्रोचे प्रमुख सिवन यांनी सांगितलं की, चांद्रयान 2 बरोबर असलेला ऑरबिटरचं (Orbiter) काम अपेक्षेप्रमाणे सुरू आहे. ऑरबिटरवर 8 उपकरणं लावलेली आहेत. या उपरकरणांचं काम सुरू झालं असून ते उत्तम काम करत आहेत. त्यामुळे इस्रोने आता पुढच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे लक्ष वेधलं आहे. गगनयान या मोहिमेची तयारी आता ISRO ने सुरू केली आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या जागी विक्रमचं लँडिंग झालं त्या भागात आता पुढचे 14 दिवस अंधार असेल. सूर्यकिरणं त्या भागापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे चंद्रावर या भागाचं तापमानसुद्धा खूप कमी होईल. ते उणे 183 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल.

इतर बातम्या - '...तोपर्यंत चौकशीसाठी येऊ नये', ED कडून शरद पवारांना विनंती

ऑर्बिटरचे काम सुरू

यावेळी सिवन यांनी, भारताचे ऑर्बिटर चांगले काम करत असल्याचे सांगितले. यात 8 उपकरणे आहेत, जे आपले काम करत आहे. ऑर्बिटरनं फोटो पाठवण्या सुरुवात केली आहे, शास्त्रज्ञ या फोटोंची तपासणी करत आहेत. ऑर्बिटरवर 8 पेलॉड आहेत. जे चंद्रवर थ्री-डी मॅपिंगसह दक्षिण ध्रवावर पाणी, बर्फ आणि मिनरल्स शोधण्याचे काम करतील. ऑर्बिटरचा कार्यकाळ एक वर्षांचा असणार आहे.

VIDEO: PMC बँकेतील खातेधारकांना मोठा दिलासा, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 09:53 AM IST

ताज्या बातम्या