12 ऑगस्ट : ही बातमी आहे नासाच्या क्षितीजावर उगवणाऱ्या नव्या सूर्योदयाची. सूर्याचा सर्वात जवळून अभ्यास करण्यासाठी नासातर्फे आज पार्कर सोलर प्रोब हे यान सोडण्यात आलं आहे. खरतरं हे यान काल अवकाशात झेपावणार होतं. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ते आज करण्यात आलं. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नासाने हे रोबोटिक यान पाठवलं आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केप केनेरवल इथून हे यान प्रेक्षपित केलं गेलं. नासाच्या या महत्वाकांक्षी मोहिमेचा खर्च 1.5 अब्ज डॉलरएवढा आहे.
3-2-1… and we have liftoff of Parker #SolarProbe atop @ULAlaunch’s #DeltaIV Heavy rocket. Tune in as we broadcast our mission to “touch” the Sun: https://t.co/T3F4bqeATB pic.twitter.com/Ah4023Vfvn
— NASA (@NASA) August 12, 2018
नासाच्या क्षितीजावर नवा सूर्य
- सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी नासाचा 1.5 अब्ज डॉलरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
- सूर्याचा सर्वात बाहेरचा भाग 'कोरोना'तून प्रवास करणारं पार्कर पहिलंच यान असेल
- 1976 मध्ये सोडलेल्या हेलिओज 2 या यानापेक्षा पार्कर सातपट सूर्याच्या जवळ पोहोचेल
- सूर्याजवळ पोहचण्यासाठी पार्कर 61,15,508 किमीचा प्रवास करणार
- मंगळ मोहिमेसोठी लागणाऱ्या ऊर्जेच्या 55 पट ऊर्जा पार्करसाठी लागणार
- 2024, 2025 मध्ये पार्करच्या शेवटच्या तीन कक्षा सूर्याच्या अधिक जवळ असतील
Launch teams have conducted the poll and we are ‘GO’ for the 3:31 am ET launch of Parker #SolarProbe! Watch live as we embark on a mission to study the Sun closer than any other spacecraft: https://t.co/T3F4bqeATB pic.twitter.com/P35xDLnRYq
— NASA (@NASA) August 12, 2018
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Launch Parker Solar, Mars, Nasa, Parker Solar Probe, Son, Spacecraft, Video