Home /News /news /

'अम्फान' मुळे नुकसान झालेल्या बंगालला केंद्राकडून 1 हजार कोटीचं पॅकेज, मोदींनी केलं जाहीर

'अम्फान' मुळे नुकसान झालेल्या बंगालला केंद्राकडून 1 हजार कोटीचं पॅकेज, मोदींनी केलं जाहीर

केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला 1 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

    बशीरहाट (कोलकाता), 22 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील अम्फान वादळामुळे झालेल्या नुकसानीचं हवाई सर्वेक्षण केलं. केंद्राच्या वतीने त्यांनी बंगालला 1 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चक्रीवादळामुळे झालं नुकसान भरून निघून बंगाल पुन्हा उदयास येईल अशी त्यांना आशा आहे. पीएम मोदी म्हणाले की, या दु: खाच्या घटनेत ते पश्चिम बंगालसोबत आहेत. बंगालवर कोरोना आणि अम्फान या दोन्ही आपत्तींशी एकत्र लढत आहे. मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान मदत निधीतून चक्रीवादळात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. 'पश्चिम बंगाल कोरोना आणि अम्फान या दोन समस्यांशी लढत आहे. कोरोनाशी लढण्याचा मंत्र म्हणजे जिथे आहे तिथेच रहाणं. परंतु वादळाचा मंत्र शक्य तितक्या लवकर एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आहे. पश्चिम बंगालला दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया एकाच वेळी लढाव्या लागल्या. पण ममतांना भारत सरकार आवश्यक ती मदत करेल.' असं मोदी म्हणाले आहेत. कोरोनाचं संकट बाजूला राजकारण पेटलं, भाजपचं आंदोनला महाविकास आघाडीचं प्रत्यूत्तर 80 लोकांच्या मृत्यूचं दुःख - पंतप्रधान मोदी चक्रीवादळाच्या संभाव्यतेबद्दल संबंधित सर्व लोकांशी मी सतत संपर्कात होतो. वादळाचा कमीत कमी परिणाम होण्याचा आम्ही प्रयत्न केला. असं असूनही, 80 लोक मरण पावले. याचं मला खूप दुःख असल्याचं मोदी म्हणाले. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील पाहण्यासाठी केंद्र सरकार एक पथक पाठवेल. लोकांच्या मदत व पुनर्वसनासाठी सर्व प्रयत्न केले जातील. विकृती! वासनेची भूक भागवसाठी दफन केलेला मुलीचा मृतदेह काढला बाहेर, शरीरसंबंध ठेव दरम्यान, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश केल्यानंतर सुपर चक्रीवादळ 'अम्फान' (Super Cyclone Amphan) बांगलादेशच्या दिशेनं गेलं. बंगालमध्ये (West Bengal) अम्फानमुळे 72 लोकांचा मृत्यू झाला तर दोन जिल्हे पूर्णपणे उध्वस्त झाले. ओडिशामध्येही बरेच नुकसान झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रवाती वादळ अम्फानमुळे प्रभावित भागांचा दौरा केला. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल 57 दिवसांनी मोदी दिल्लीतून बाहेर पडले. तब्बल 59 दिवस लोकं घरांमध्ये कैद होते. दरम्यान, पंतप्रधान दिल्लीत मुक्काम करतात. या दिवसांत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी देशातील आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये भाग घेतला. आज पहिल्यांदाच मोदी दिल्लीबाहेर पडले. लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि चित्रकूट येथे 83 दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी अखेरचा दौरा केला होता. नक्षलवादी हल्ल्यात वडिलांना गमावलं, कोरोनाशी लढताना पोलीस आईने सोडले प्राण संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Cyclone, Narendra modi

    पुढील बातम्या