Unpredictable Prime Minister : पंतप्रधान मोदींचे सर्वांना चकवा देणारे 11 निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केव्हा कुठला निर्णय घेतील याचा अंदाच कुणालाच बांधता येत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या अनेक निर्णयांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • Share this:

मोदींच्या या निर्णय क्षमतेची ओळख पहिल्यांदा झाली ती त्यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळी म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी. शपथविधी समारंभाला काही दिवस शिल्लक असतानाच मोदींनी सर्व सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी समारंभाचं निमंत्रण दिलं आणि त्याला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.

मोदींच्या या निर्णय क्षमतेची ओळख पहिल्यांदा झाली ती त्यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळी म्हणजे साडेचार वर्षांपूर्वी. शपथविधी समारंभाला काही दिवस शिल्लक असतानाच मोदींनी सर्व सार्क देशांच्या प्रमुखांना शपथविधी समारंभाचं निमंत्रण दिलं आणि त्याला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते.(फोटो सौजन्य - पीटीआय)

राफेलच्या मुद्यावरून काँग्रेसने देशभर उठवलेली आरोपांची राळ, विधानसभा निवडणुकीतला पराभव यामुळे अडणीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सवर्ण जातींना 10 टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय सर्वांसाठीच अनपेक्षीत होता.

नरेंद्र मोदींच्या ज्या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला तो निर्णय म्हणजे नोटबंदी. या निर्णयाची माहिती त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांनासुद्धा नव्हती. एवढी त्याची गुप्तता ठेवली गेली. त्या निर्णयाने सर्व देशच आश्चर्यचकीत झाला होता.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे अंदाज बांधले जात होते. अनेक नावं चर्चेत होती. शेवटच्या क्षणी योगी आदित्यनाथ यांचं नाव जाहीर झालं आणि सर्वांचेच अंदाच साफ चुकले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप कुणाला प्राधान्य देणार याची चर्चा माध्यमात होत होती. लालकृष्ण अडवानींच नाव असणार का? असा सगळ्यांना प्रश्न होता. रामनाथ कोविंद यांचं जेव्हा नाव जाहीर झालं त्यावेळी अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं. मोदींची ही निवड अनपेक्षीत होती.

सर्जिकल स्ट्राईकही असाच निर्णय होता. सरकार पाकिस्तानविरुद्ध असा काही निर्णय घेईल असा अंदाजच कुणी बांधला नव्हता. लष्करी अधिकाऱ्यांनी जेव्हा पत्रकार परिषदेत याची घोषणा केली तेव्हा सगळा देश आश्चर्यचकीत झाला होता.

दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पाकिस्तान भेटीवर गेले ही बातमी आली पण त्यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. पण मोदी जेव्हा लाहोरला उतरले तेव्हा सर्व जगालाच धक्का बसला. नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नालाही मोदींनी हजेरी लावली होती.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर निघालेल्या अंतयात्रेत पार्थिव ठेवलेल्या रथाच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल सहा किलोमीटर अनवाणी चालत सहभागी झाले. पंतप्रधानपदावरच्या नेत्याला सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळं असं चालणं हे धोक्याचं असतं. मात्र तो धोका पत्करत मोदींनी चालत जाण्याचा निर्णय घेतला.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी निवडणुक आयोगाने त्यांना रोड शो करण्याला परवानगी दिली नाही. तेव्हा त्यांनी अभिनव पद्धतीने सी-प्लेनच्या मदतीने साबरमती नदीतीरावरून रोड शो केला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ओबामांना मोदींनी मन की बात मध्ये सहभागी करून घेतलं आणि त्यांना ऐकेरी नावाने माझा मित्र बराक, अशी हाकही मारली. एखाद्या अमेरिकन अध्यक्षांनी अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या या निर्णय घेण्याच्या पद्धतीबद्दल नुकतच ANIला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले, " पठाणकोटच्या हल्ल्यानंतर लोकांमध्ये राग होता. सरकार फार काही करणार नाही, थोड्या दिवसांमध्ये सर्व विसरुन जाईल. इतरांसारखेच मोदीही इशार देऊन सोडून देतील असं लोकांना वाटलं मात्र मोदी हा त्या प्रकारातला माणूस नाही हे लोकांना आता कळलं असेल."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 05:12 PM IST

ताज्या बातम्या