मोदी सरकार 2.0 : सुषमा स्वराज यांच्यासह या मंत्र्यांना पुन्हा संधी नाही

मोदी सरकारमध्ये गेल्या वेळी समावेश झालेल्या काही मंत्र्यांना यावेळी मात्र स्थान मिळणार नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 07:17 PM IST

मोदी सरकार 2.0 : सुषमा स्वराज यांच्यासह या मंत्र्यांना पुन्हा संधी नाही

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान नाही. सुषमा स्वराज यांनी यावेळी लोकसभेची निवडणूकही लढवली नव्हती.

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे यावेळी मंत्रिमंडळात नसतील. तब्येतीच्या कारणामुळे आपण मंत्रिपदाची जबाबदारी घेणार नाही, असं अरुण जेटलींनी जाहीर केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अरुण जेटलींनी मंत्रिमंडळात राहावं, असा मोदींचा आग्रह होता, अशी चर्चा आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंना यावेळी मंत्रिमंडळात स्थान नाही. आधीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि नागरी उड्डाण अशी खाती होती. आता मात्र त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात येणार नाही, अशी माहिती आहे.

Loading...

मनेका गांधी यांच्याकडे गेल्या वेळी महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी होती. पण यावेळा त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. त्या यावेळी सुलतानपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत नाही. अनंत गीते यांच्याकडे मागच्या सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्रालय होतं.

राधामोहन सिंह हे केंद्रीय कृषीमंत्री होते पण या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणार नाही. त्यांच्याऐवजी कृषीखातं कुणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.

मनोज सिन्हा यांच्याकडे आधी दळणवळण आणि रेल्वेराज्यमंत्रिपद होतं. आता त्यांचं नाव मंत्रिपदाच्या यादीत नाही.

पी. राधाकृष्णन यांच्याकडे अर्थराज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती पण आता या मंत्रिमंडळात त्यांना स्थान नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...