नवी दिल्ली 05 फेब्रुवारी : अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आज एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार एका ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट असं त्या ट्रस्टचं नाव असून सर्व 67 एकर जमीन या ट्रस्टला दिली जाणार आहे. त्याचबरोबर मशिद बांधण्यासाठी सुन्न वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्यासाठी कार्यवाही सुरु झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हे निवेदन केलं. पंतप्रधान म्हणाले, राम हा देशातल्या प्रत्येकाच्या मनात आणि कणाकणात आहे. रामजन्मभुमीवर भगवान रामांचं भव्य आणि दिव्य मंदिर बांधण्यासाठी सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, अयोध्येचा निकाल आल्यानंतर देशाविसायांनी अतिशय प्रगल्भतेचं दर्शन घडवलं होतं. त्यामुळे सगळ्या देशवासियांना मी धन्यवाद देतो. देशातल्या सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याचं माझ्या सरकारचं धोरण आहे. त्यानुसार सरकारची वाटचाल सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
PM Modi in Lok Sabha: We have readied a scheme for the development of Ram Temple in Ayodhya. A trust has been formed, it is called 'Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra.' pic.twitter.com/LOWDqzvuLU
— ANI (@ANI) February 5, 2020 हा ऐतिहासिक क्षण असून सगळ्यांनी एकदिलाने या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी सर्वच पक्षांना केलं. भारताची संस्कृती ही वसुधैव कुटुंबकमची आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आणि एकदिलाने पुढे जाण्याचं आमचं धोरण असून सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हेच सरकारचं धोरण आहे.असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Ram Mandir