S M L

काँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

'काँग्रेसने डिक्शनरीतल्या सर्व शिव्यांची लाखोळी मला वाहिली. तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल तेवढं कमळ जास्त उमलेल'

Updated On: Sep 25, 2018 04:13 PM IST

काँग्रेस जेवढ्या शिव्या देईल, तेवढं कमळ फुलेल - नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

भोपाळ,ता. 25 सप्टेंबर : काँग्रेसने गेल्या 70 वर्षात देशात फक्त व्होट बँकेचं राजकारण केलं. या राजकारणामुळं देशाचं नुकसान झालंय. काँग्रेस हे देशावरचं ओझं आहे अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ इथं भाजप कार्यकर्त्यांच्या महाकुंभ मेळाव्यात ते बोलत होते. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी या मेळाव्याला उपस्थित असल्याने भाजपच्या विधानसभा आणि लोकसभा प्रचाराची ही सुरूवात मानली जातेय.

काँग्रेसने डिक्शनरीतल्या सर्व शिव्यांची लाखोळी मला वाहिली. त्यातला एकही शब्द सोडला नाही मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल तेवढं कमळ जास्त उमलेल असा टोल त्यांनी काँग्रेसला लगावला. काँग्रेस देशात महाआघाडी करण्यात अपयशी ठरली आहे त्यामुळे त्यांचे आंतरराष्ट्रीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. आता दुसरे देश भारताचा पंतप्रधान ठरवतील का असा सवालही त्यांनी केला.

राफेल मुद्यावरून सध्या काँग्रेसने भाजप आणि नरेंद्र मोदींना टार्गेट केलंय त्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र मोदींनी राफेल मुद्यावर न बोलता काँग्रेसवर हल्लाबोल केला. तिहेरी तलाकच्या मुद्यावर काँग्रेसनं घेतलेली भूमिका ही महिला विरोधी आहे. मुस्लिम महिलांच्या दु:खाशी त्यांना देणं घेणं नाही. त्यांनी अशाच प्रकारचं राजकारण करून देशात फुटीची बीजं रोवली आहेत अशी टीकाही त्यांनी केली.


उच्च शिक्षित महिलेने दुकानात चोरला मोबाईल, समोर आलं धक्कादायक सीसीटीव्ही

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 04:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close