एनडीएकडून पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचीच निवड!

Exit Pollमुळे उत्साह संचारलेल्या NDAच्या नेत्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री शाहीभोजन दिलं.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 11:44 PM IST

एनडीएकडून पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचीच निवड!

नवी दिल्ली, 21 मे : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधानपदी कोण विराजमान होणार यावरून अनेक तर्कविर्तकांना उधाण आले होते. परंतु, एनडीएने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या नावावरून पडदा टाकला आहे. नरेंद्र मोदी यांचीच पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी निवड करण्यात आली आहे.

Exit Pollमुळे उत्साह संचारलेल्या NDAच्या नेत्यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी रात्री शाहीभोजन दिलं. दिल्लीतल्या प्रख्यात अशोका हॉटेलमध्ये मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांचा भाजपने अगत्याने पाहुणचार केला. फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याने सर्वच नेत्यांच्या चेहेऱ्यावर त्याची झाक स्पष्ट दिसत होती.

शाही भोजनाच्या आधी एनडीएच्या सर्वच प्रमुख घटकपक्षांच्या नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांचा सत्कारही करण्यात आला.

उद्धव ठाकरेंना मानाचे पान

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बैठकीत मानाचं स्थान देण्यात आलं. अमित शहा यांच्या बाजूला उद्धव यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई सुद्धा या भोजनाला उपस्थित होते.

Loading...

घटकपक्षांची काळजी

मित्रपक्षांना भाजप विचारत नाही अशी सारखी टीका करण्यात येते. या स्नेहभोजनाने ती प्रतिमा पुसण्याचाही प्रयत्न भाजपने केलाय. त्याचबरोबर बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास काठावरच्या पक्षांना योग्य तो संदेश जावा असाही भाजपचा प्रयत्न आहे.

आता प्रतिक्षा निकालाची

रविवारी आलेल्या सर्वच Exit Polls मध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झाल्याने मतमोजणीच्या दोन दिवस आधी सर्व मित्र पक्षांना भाजपने हे स्नेहभोजन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमात उपस्थित तर होतेच त्याचबरोबर सर्व नेत्यांचं आदरातिथ्यही करत होते. 23 मेला काय निकाल लागतील याची सर्वांना उत्सुकता असली तरी नेमकं काय होणार आहे याची दिशा सर्वांनाच कळाली आहे.

------------------


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 11:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...