नरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक!

नरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक!

खरीपातल्या 14 प्रमुख पिकांच्या हमीभावात उत्पादनखर्च अधिक 50 टक्क्यांच्या वाढीनं हमीभावात वाढ करण्याच्या निर्णयाला केंद्रानं मंजुरी दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली,ता,4 जूलै: केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना खुष करण्याची तयारी सुरु केलीय. शेतकऱ्यांची नाराजी लक्षात घेऊन खरीपातल्या 14 प्रमुख पिकांच्या हमीभावात उत्पादनखर्च अधिक 50 टक्क्यांच्या वाढीनं हमीभावात वाढ करण्याच्या सूत्राला मंजुरी दिलीय. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणूकीची तयारी असल्याचं बोललं जातय. मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीनं या नव्या दरांच्या वाढीला मंजूरी दिलीय. यानुसार धानाच्या हमीभावात प्रतिक्विंटल 200 रुपयांची वाढ घोषित करण्यात आलीय.

महाराष्ट्रातल्या ज्वारी या पिकाला सर्वाधिक भाववाढ मिळाला आहे. त्यापाठोपाठ तूर, मूग आणि उडदाच्या दरातही वाढ करण्यात आलीय. रागीच्या दरात जवळपास 1 हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ प्रस्तावित आहे. सरकारनं सरासरी प्रतिक्विटंल 200 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत भाववाढ जाहीर केलीय.

हमीभावात दीडपट वाढ करुन सरकारनं 2019 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केलीय. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार मोदींनी आपला शब्द पाळण्यासाठी ही कवायत सुरु केलीय. पण प्रत्यक्षात सरकारनं या 14 पिकांची हमीभावानं खरेदी होईल तेव्हाच या हमीभावाढीचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

असे असतिल नवे दर

ज्वारी - 2,430 रुपये प्रति क्विंटल

तूर - 5,675 रुपये प्रति क्विंटल

तीळ - 6,249 रुपये प्रति क्विंटल

मूग - 6,975 रुपये प्रति क्विंटल

भुईमुग - 4,890 रुपये प्रति क्विंटल

सोयाबीन- 3399 रुपये प्रति क्विंटल

हेही वाचा...

Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट

पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी मांडली 10 विधेयक

'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 02:45 PM IST

ताज्या बातम्या