नरेंद्र मोदींना काय खायला आवडतं? अक्षयच्या मुलाखतीत नव्हत्या या गोष्टी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षयकुमारच्या मुलाखतीत त्यांना आंबा आवडतो, असं सांगितलं होतं. त्यावरूनच मोदींच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर चर्चा झाली. त्यांच्या फिटनेसचं रहस्य त्यांच्या आहारात आहे, असं प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचं म्हणणं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 08:13 PM IST

नरेंद्र मोदींना काय खायला आवडतं? अक्षयच्या मुलाखतीत नव्हत्या या गोष्टी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीवनशैली आणि त्यांचं धकाधकीचं वेळापत्रक याबदद्ल आपण अनेक ठिकाणी वाचत असतो. नरेंद्र मोदींच्या फिटनेसबद्दलही आपण ऐकून आहोत. म्हणूनच ते कसा आहार घेत असतील याबदद्ल आपल्याला उत्सुकता आहे.

नरेंद्र मोदींना काय खायला आवडतं ? त्यांना गोड आवडतं का ? याबदद्लही अनेकांच्या मनात प्रश्न आहेत.

मोदींची ऊर्जा, त्यांची काम करण्याची क्षमता याबदद्ल विरोधकांनीही त्यांची प्रशंसा केली आहे. नरेंद्र मोदींना गुजराथी पद्धतीचं जेवण आवडतं. त्यांना हलवाही खूप आवडतो.

Loading...

भारताचे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी पंतप्रधानांच्या आहाराबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. मोदींच्या यूएई दौऱ्यात त्यांनी मोदींसाठी जेवण बनवलं होतं. पंतप्रधान पूर्णपणे शाकाहारी आहेत. असं असलं तरी ते वेगवेगळ्या चवी पसंत करतात.

मोदींना शेवग्याच्या पानांचा पराठाही खूप आवडतो. संजीव कपूर यांना मोदींनी या पराठ्याची रेसिपीही सांगितली होती.

पंतप्रधान मोदींना वेगवेगळ्या पदार्थांची चव घ्यायला आवडतं. त्यांना कोणत्याच पदार्थाची अॅलर्जी नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी जेवण बनवणं सोपं जातं.

मोदी नेहमीच त्यांच्या आचाऱ्यांना खिचडी बनवायला सांगतात. उपवासाच्या दिवशी ते गरम पाण्यातला लिंबूरस घेतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...