मोदी बायोपिकच्या ट्रेलरची उडवली थट्टा, सोशल मीडियावर व्हायरल झाले मीम्स

सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया युझर्स तर सिनेमातील संवादाचे मीम्स तयार करत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 09:34 PM IST

मोदी बायोपिकच्या ट्रेलरची उडवली थट्टा, सोशल मीडियावर व्हायरल झाले मीम्स

काही दिवसांपूर्वीच पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर मनोज जोशी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया युझर्स तर सिनेमातील संवादाचे मीम्स तयार करत आहेत. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

सिनेमात ‘हम हिंदुस्तान नहीं बन पाए’, ‘माँ में सन्यासी बनना चाहता हूं’ आणि ‘हाथ काट दूंगा’ या संवादांची थट्टा उडवली जात आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

गीतकार जावेद अख्तर यांनी सिनेमाच्या क्रेडिट लाइनमध्ये स्वतःचं नाव पाहून आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यांनी ट्वीटवर लिहिले की, ‘सिनेमाच्या पोस्टवर माझं नाव पाहून मी चकीत झालो. या सिनेमासाठी मी एकही गाणं लिहिलं नाही.’ (सर्व फोटो- सोशल मीडिया)

Loading...

सिनेमाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. ओमंग यांनी याआधी मेरी कॉम आणि सरबजीत या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. जानेवारीमध्ये या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती आणि आता हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

सुरुवातीला हा सिनेमा १२ एप्रिला प्रदर्शित होणार होता. मात्र निर्मात्यांनी आता हा सिनेमा ५ एप्रिलला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमात मोदींची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विवेकचे अनेक लूक समोर आले आहेत. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

विवेक ओबेरॉय त्याच्या लूक्समुळे अनेक लोकांच्या थट्टेचा  विषयही ठरला आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

सिनेमात मोदी यांचा चहा विकण्यापासून ते राजकारणात प्रवेश करेपर्यंतचा आणि पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

सिनेमात बोमन इरानी, दर्शन कुमार, झरीना वहाब, प्रशांत नारायणन, बरखा बिष्ट यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. (सर्व फोटो- सोशल मीडिया)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...