वाराणसी ते कोलंबो विमानसेवा सुरू करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

वाराणसी ते कोलंबो विमानसेवा सुरू करणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

मोदींनी वाराणसी ते कोलंबो थेट विमानसेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय.

  • Share this:

12 मे : दहशवाद हा विश्व शांतीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाचा उल्लेख न करता  टीकास्त्र सोडलं. तसंच यावेळी वाराणसी ते कोलंबो थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणाही मोदींनी केली.

वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी कोलंबोत पोहोचले. पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय बौद्ध संमेलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. दहशवाद हा विश्व शांतीचा सगळ्यात मोठा शत्रू असल्यांचं ते म्हणाले. तसंच यावेळी मोदींनी वाराणसी ते कोलंबो थेट विमानसेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय.

ऑगस्ट 2017पासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. यावेळेस मोदी म्हणाले, वैशाख पोर्णिमा हा श्रीलंकेतला सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि श्रीलंकेशी आपलं जुनं नातंही आहे. भारतातूनच बौद्ध धर्म हा श्रीलंकेत पोहचलाय. दरम्यान, या दौऱ्यात ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले.

First published: May 12, 2017, 4:28 PM IST

ताज्या बातम्या