News18 Lokmat

ट्विटर फॉलोअर्सच्या 'टॉप टेन' यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवरचे अनभिषिक्त सम्राट असल्याचं समोर आलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 05:22 PM IST

ट्विटर फॉलोअर्सच्या 'टॉप टेन' यादीत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,ता.12 जुलै : अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवरचे अनभिषिक्त सम्राट असल्याचं समोर आलंय. ट्विटरवर सर्वाधिक फोलोअर्स असलेल्यांच्या जागतिक यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात तिस-या क्रमांकावर आहेत. या यादीत अमेरीकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्या तर पोप फ्रान्सिस दुसऱ्या स्थानावर आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या यादीत 8 व्या स्थानी आहेत. जगातल्या 10 सर्वाधिक ट्विटर फोलोअर्स अकाऊंटमध्ये 3 अकाऊंट ट्रम्प यांचे तर दोन अकाऊंट नरेंद्र मोदी यांचे आहेत. जागतिक पाळतीवर कुणाची किती लोकप्रियता आहे हे ट्विटर फॉलोवर्सच्या संख्येवरुन ओळखलं जातं. एका ताज्या आकडेवारीनुसार जगातल्या पहिल्या 10 ट्विटर अकाऊंटची यादी करण्यात आली आहे त्यात जगातील ट्विटरवरचे सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नावं समोर आली आहेत.

अशी आहे आकडेवारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटला 53.4 दशलक्ष फोलोअर्स आहेत.

पोप फ्रान्सीस याचे 47 दशलक्ष फोलोअर्स आहेत.

पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटला 43.4 मिलीयन नागरिक फोलो करतात. या यादीत मोदी तिस-या स्थानी आहे.

Loading...

खाजगी अकाऊंट व्यतिरिक्त अमेरीकन राष्ट्राध्यक्ष म्हणुनही ट्रम्प यांच ट्विटर अकाऊंट आहे. या अकाऊंटला 23.6 दशलक्ष फोलोअर्स आहेत, हे अकाऊंट पाचव्या स्थानी आहे.

ट्रम्प यांच्याशी संबंधित अमेरीकन प्रेसिडेन्सीचेही ट्विटर अकाऊंट आहे. त्याला 17.4 दशलक्ष फोलोअर्स असून ते 6 व्या क्रमांकावर आहे.

ट्रम्प यांच्या तिनही ट्विटर अकाऊंटला मिळून 94.4 दशलक्ष फोलोअर्स आहेत.

ट्रम्प यांच्या प्रमाणेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही खाजगी ट्विटर अकाऊंट आहे. त्याला 26.7 दशलक्ष लोक फॉलो करतात. हे अकाऊंट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

दोन्ही अकाऊंटची बेरीज केली तर ट्विटरवर मोदींना जगभरातील एकुण 70.1 दशलक्ष फोलोअर्स आहेत.

अन्य काही व्यक्ती, त्यांचे क्रमांक आणि फोलोअर्सची संख्या

तुर्कीचे अध्यक्ष रेसेप एर्दोगन, 7 वा क्रमांक, 13.2 दशलक्ष फोलोअर्स

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, 8वा क्रमांक, 11.8 दशलक्ष फोलोअर्स

जॉर्डनच्या राणी रैना अल अब्दुल्लाह, 9 वा क्रमांक, 10.9 दशलक्ष फोलोअर्स

इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो, 10वा क्रमांक, 10.3 दशलक्ष फोलोअर्स

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...