Home /News /news /

दिल्ली निवडणुकांमध्ये का झाला भाजपचा पराभव? RSSने सांगितली 'INSIDE STORY'

दिल्ली निवडणुकांमध्ये का झाला भाजपचा पराभव? RSSने सांगितली 'INSIDE STORY'

दिल्लीत संघटनेची भाजपाने पुनर्रचना केली पाहिजे. विधानसभा पातळीवरील निवडणुकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) नेहमीच जिंकू शकत नाहीत.

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा (Delhi Election) निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) जबरदस्त तयारी केली असताना त्यांना पराभवाची धूळ चाखायला लागली. संपूर्ण देशभरात मोठ्या मताधिक्याने पुढे आलेला भाजप पक्ष महाराष्ट्रतही मात्र मागच्या बाकावर जाऊन बसला. दिल्लीच्या निवडणुकांमध्येही भाजपचा दारुण पराभव झाला. यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) भाजपच्या पराभवाचं कारणं सांगितलं आहे. इतकंच नाही तर निवडणुकांमध्ये काय करायला हवं याचा सल्लाही भाजपला देण्यात आला आहे. दिल्लीत संघटनेची भाजपाने पुनर्रचना केली पाहिजे. विधानसभा पातळीवरील निवडणुकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) नेहमीच जिंकू शकत नाहीत. आरएसएसच्या इंग्रजी मुखपत्र संघटकात छापलेल्या लेखातही भाजपाच्या पराभवाची ही दोन महत्त्वपूर्ण कारणं नमूद केली गेली आहेत. दिल्लीत सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या काळात ती 3 ते 8 जागांवर पोहोचू शकली. 2015च्या निवडणुकीत दिल्लीत भाजपाला 3 जागा मिळाल्या, तर यावेळी त्यांना 8 जागांवर समाधान मानावं लागलं. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 70 पैकी 62 जागांवर बाजी मारली आहे.  जिंकल्या. झारखंड आणि दिल्लीच्या पराभवासह मताधिक्य घटल्याने भाजप नाराज, मोठा निर्णय घेण्याची शक्यता आरएसएसने आपल्या मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मध्ये लिहिले आहे की, '2015नंतर भारतीय जनता पक्षाने तळागाळातील पातळीवर पायाभूत सुविधा पुनरुज्जीवित करण्यात आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर प्रसिद्धी घेण्यात अपयशी ठरले. लढवलेल्या निवडणूकीत अपयशाची दोन मोठी कारणे होती. त्यात पुढे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा विधानसभा स्तरावरील निवडणुकीत नेहमीच मदत करू शकत नाहीत आणि दिल्लीत संघटनेची पुनर्रचना करण्याशिवाय पर्याय नाही. इतर बातम्या - Maha Shivratri 2020: महाशिवरात्र का साजरी करतात? हे कारण तुम्हाला माहीत आहे का? दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपने जोर लावूनही पदरात निराशा गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो. अनेक निवडणुकांच्या प्रचारात भाजप नेते 'द्वेषपूर्ण घोषणा' देताना दिसले. अनेक केंद्रीय मंत्रीही यात सहभागी झाले होते. या वेळी 'देशद्रोह्यांना गोळ्या घाला', आणि केजरीवाल यांना 'दहशतवादी' असंही म्हणण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्यानंतर काही महिन्यांनंतरच दिल्ली निवडणुकीत भाजपला कठोर पराभवाला सामोरं जावं लागलं. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हाने BJP वर साधला निशाणा, म्हणाले - माझ्या जुन्या पक्षाला शुभेच्छा, छान कामगिरी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर गृहमंत्री अमित शहाही म्हणाले होते की, 'गोळ्या घाला' आणि 'भारत-पाक सामना' सारख्या विधानांना टाळायला हवं होतं. ते म्हणाले की, पक्ष अशा प्रकारच्या वक्तव्यांपासून स्वत: ला दूर ठेवतो. वृत्तसंस्था पीटीआयने अमित शहा यांच्या हवाल्यात म्हटलं आहे की, पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण विधानांमुळे निवडणुकीत भाजपाला त्रास सहन करावा लागला. अमित शहा म्हणाले की, आम्ही निवडणुका केवळ जिंकण्यासाठी किंवा पराभूत करण्यासाठी लढत नाही. अनेक पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी निवडणुका असतात. ते म्हणाले होते की, दिल्ली निवडणुकांबाबत माझे मूल्यांकन चुकीचं असल्याचं सिद्ध झालं. इतर बातम्या - INDvsNZ : पहिल्या सेशनवर न्यूझीलंडचा दबदबा, भारतीय संघाला 3 मोठे धक्के
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: BJP, Congress, Maharashtra, नरेंद्र मोदी, भाजप

    पुढील बातम्या