दाभोलकर हत्या प्रकरण : औरंगाबादमध्येही जप्त झाल्या बंदुका आणि तलवारी

दाभोलकर हत्या प्रकरण : औरंगाबादमध्येही जप्त झाल्या बंदुका आणि तलवारी

एक गावठी पिस्तुल, एक एअर पिस्तुल, तीन जिवंत काडातूस, एक कुकरी, एक तलवार असं साहित्य या तिघांकडे असल्याची तक्रार सीबीआयने दिली आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद,ता,22 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरेच्या माहिती नुसार सीबीआयने औरंगाबादमध्ये झाडाझडती घेऊन काही हत्यारं जप्त केली आहे. या प्रकरणी सीबीआयच्या तक्रारीवरून शस्त्र लपवणं आणि बेकायदा शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटीचौक पोलिसात शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे, रोहित रेघे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक गावठी पिस्तुल, एक एअर पिस्तुल, तीन जिवंत काडातूस, एक कुकरी, एक तलवार अस साहित्य या तिघांकडे असल्याची तक्रार सीबीआयने दिली आहे. जप्त केलेलं साहित्य दाभोलकरांच्या हत्येत वापरलं गेल्याचा संशय आहे. याबाबत पुढील तपास सीबीआय करणार आहे.

Exclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव!

मंगळवारी एटीएसने सचिन अंदुरेच्या नातेवाईकांच्या घरी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. या पाच पैकी दोघे हे सचिन अंदुरेचे मेव्हणे होते तर एक जण मित्र होता. इतर दोघांचा सहभाग नसल्यामुळे सुटका करण्यात आलीये.

दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरेची कसून चौकशी सुरू आहे. एटीएसच्या टीमने साताऱ्यातही करवाई केली. परिसरातील मनजीत प्राईडमधील एका घराची झडती घेतली. पहाटे चार वाजता एकाला ताब्यात घेतले होते. हा सचिन अंदुरेचा मित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

व्यापाऱ्याचा केला 'बकरा', हाती सोपवला कुत्रा !

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते अशी धक्कादायक माहितीही पुढं आली आहे. पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे. पानसरेंच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेच्या कॉम्प्युटरमध्ये धर्मद्रोही नावानं एक फोल्डर सेव्ह करण्यात आला होता. त्या फोल्डरमध्ये तीघांचा फोटो सेव्ह करण्यात आले होते. सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रामधला हा सगळा तपशील न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे.

 

First published: August 22, 2018, 8:42 AM IST

ताज्या बातम्या