'डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास केव्हा लागणार'?

'डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास केव्हा लागणार'?

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत मात्र अजुनही या प्रकरणाचे साधे धागेदोरेही मिळत नाही यावरून महाराष्ट्र पोलिसांची अकार्यक्षमता सिद्ध होते.

  • Share this:

मुंबई,ता.17 जून: कर्नाटक सरकारला गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांचे मारेकरी सापडतात, महाराष्ट्र सरकारला मात्र नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे अशी टीका अंनिसचे सदस्य डॉ.हमीद दाभोळकर यांनी केली आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत मात्र अजुनही या प्रकरणाचे साधे धागेदोरेही मिळत नाही यावरून महाराष्ट्र पोलिसांची अकार्यक्षमता सिद्ध होते असंही ते म्हणाले. सीबीआयकडे तपास देवूनही या प्रकरणाचा अजुन छडा लागलेला नाही हे सर्व विचारी महाराष्ट्राला मान खाली घालावी लागणारी गोष्ट आहे.

दरम्यान, गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी कट रचणाऱ्या मास्टर माईंडची ओळख पटली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुन्ना या नावाच्या व्यक्तीने हत्येसाठी प्रवृत्त केलं अशी कबूली या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी परशुराम वाघमारे यानं एटीएस कडे दिल्याची माहितीही त्याने दिली.

यु ट्यूबवर गोरी लंकेश यांची अनेक भाषणं ऐकली आणि गौरा लंकेश यांची माहिती काढल्याची कबूली वाघमारे यानं दिली. या मुन्नानेच वाघमारेचं ब्रेन वॉश केलं असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा...

गौरी लंकेश हत्या प्रकरण : मास्टर माईंडची ओळख पटली?

गौरी लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारेचा ताबा महाराष्ट्र एसआयटी पथकाकडे

धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली, मारेकऱ्याची कबुली

 

First published: June 17, 2018, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading