विधान परिषद पोटनिवडणुकीत राणेंची कोंडी करण्यासाठी विरोधक एकत्र येणार का ?

नारायण राणेंनी विधानपरिषदेचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे नारायण राणे पुन्हा विधानपरिषदेवर पुन्हा येण्यासाठी मतांची कशी जुळवाजुळव करतात याची उत्सुकता आता वाढलीये. कारण नारायण राणेंना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना नक्कीच एकत्र येऊ शकतात. पण तरीही या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच भूमिका निर्णायक राहणार आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 05:55 PM IST

विधान परिषद पोटनिवडणुकीत राणेंची कोंडी करण्यासाठी विरोधक एकत्र येणार का ?

15 नोव्हेंबर, मुंबई : नारायण राणेंनी विधानपरिषदेचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे नारायण राणे पुन्हा विधानपरिषदेवर पुन्हा येण्यासाठी मतांची कशी जुळवाजुळव करतात याची उत्सुकता आता वाढलीये. कारण नारायण राणेंना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना नक्कीच एकत्र येऊ शकतात. पण तरीही या निवडणुकीत राष्ट्रवादीचीच भूमिका निर्णायक राहणार आहे.

नारायण राणेंनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देऊन आता महिना उलटलाय तरीही भाजपने अजून त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. अशातच आता त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक लागलीय. राणेंना कसल्याही परिस्थितीत भाजपच्या मदतीने ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. पण अजूनही त्यांच्याकडे विजयासाठीचं पुरेसं संख्याबळ उपलब्ध नाहीये. राणेंकडील सध्याच्या मतांची बेरीज जेमतेम 137 मतांपर्यंत पोहोचतेय तर त्यांना जिंकण्यासाठी किमान 145 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. म्हणूनच सर्वप्रथम आपण राणेंकडच्या सध्याच्या मतांची आकडेवारीवर एक नजर टाकूयात...

नारायण राणेंकडे असणारी सध्याची मतं

भाजप - 122

काँग्रेसची फुटणारी 2 संभाव्य मतं (नितेश राणे, कालिदास कोळंबकर)

Loading...

अपक्ष - 13

एकूण - 137

जिंकण्यासाठी मतांची गरज - 145

विधानसभेत सध्या भाजपचे 122, शिवसेनेचे 63 , काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41 तर इतर पक्षाचे 20 आमदार आहेत. भाजप आणि इतर पक्ष एकत्र आले तरी जिंकण्यासाठी लागणारा 145चा आकडा गाठता येत नाही. पण विधान परिषदेचं हे मतदान गोपनीय पध्दतीने असल्यामुळे मतांच्या फोडाफोडीस मोठा वाव आहे. पण तरिही राणेंविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष एकत्र आले तर मात्र, राणेंसाठी ही निवडणूक निश्चितच जड जाणार आहे. पण राणेंचे सर्वपक्षीय आमदारांशी असलेले मित्रत्वाचे संबंध बघता ते सहजासहजी हार माननार नाहीत. म्हणूनच शिवसेनेतील सूत्रांच्या माहितीनुसार राणेंना चितपट करण्यासाठी विरोधकांकडून एकच उमेदवार दिला जाण्याची रणनिती आखली जातेय. यासाठी एकवेळ शिवसेना आणि काँग्रेसचं नेतृत्व सहजपणे एकत्र येईलही पण राष्ट्रवादीकडून राणेंबाबत अजून कोणतीच भूमिका जाहीरपणे मांडली जात नाहीये. त्यामुळे राणेंना हरवण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीलाच उमेदवार उभा करण्यासाठी गळ घातली जाऊ शकते. कारण फोडाफोडीच्या राजकारणात राणेंप्रमाणेच अजित पवारही तितकेज तरबेज असल्याचं सांगितलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...