भाजपात जाणार नाही, पक्षात समाधानी ; राणेंची तलवार म्यान

भाजपात जाणार नाही, पक्षात समाधानी ; राणेंची तलवार म्यान

"संघटनेत जे सुरू आहे ते सगळे राहुल गांधींच्या कानावर टाकले, मी पक्षात समाधानी आहे"

  • Share this:

05 एप्रिल :  मी सगळ्याच पक्षांच्या संपर्कात असतो. भाजपात माझे मित्र आहेत, पण कोणत्याही पक्षात जाणार नाही असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नाराजी अंकावर पडदा टाकला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे पक्षात नाराज असल्याची पुन्हा चर्चा रंगली होती. खुद्द राणे यांनी 'भूकंप सांगून येत नाही' असं सूचक वक्तव्य केलं होतं. राणेंनी दोनदा दिल्लीवारी केली. अखेरीस दुसऱ्या फेरीत राणेंची नाराजी दूर झाल्याची चिन्ह आहे. आज राणे यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. जवळपास 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर नारायण राणेंनी मीडियाशी संवाद साधला. 2019 ची निवडणूक जिंकायची असले तर काय करायला हवे यावर राहुल गांधींशी चर्चा केली असं नारायण राणेंनी सांगितलं.

तसंच मी संघटनेत जे सुरू आहे ते सगळे राहुल गांधींच्या कानावर टाकले, मी पक्षात समाधानी आहे असंही राणे म्हणाले. मी सगळ्याच पक्षांच्या संपर्कात असतो. मी युतीचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे भाजपात माझे मित्र आहेत, पण कुठल्या पक्षात जाण्या बद्दल संपर्क नाही असंही नारायण राणे स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे नारायण राणे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर विरोधात छुपी आघाडी उघडली होती. राणेंचे सुपूत्र निलेश राणे यांनी तर प्रदेशाध्यक्ष हटवा अशी मागणीच केली होती. त्यानंतर राणे यांनी दिल्लीत पक्षांच्या श्रेष्ठींची भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, नेहमीप्रमाणे आताही राणेंची नाराजी हे नाट्यचं ठरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 09:12 PM IST

ताज्या बातम्या