एनडीएमध्ये सहभागाचा निर्णय 2 दिवसात, राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर भेट

एनडीएमध्ये सहभागाचा निर्णय 2 दिवसात, राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर भेट

नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली.

  • Share this:

03 आॅक्टोबर : मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारखी निश्चित झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत एनडीएमध्ये सहभागाबद्दल दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं राणेंनी सांगितलं.

येत्या 10 आॅक्टोबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नारायण राणेंचा यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी एनडीएमध्ये कधी सहभागी होणार याबद्दल विचारणार केली असता दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं राणेंनी सांगितलं. तसंच मंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा नाही असंही राणेंनी सांगितलं.

पक्ष जाहीर करण्याच्या आदल्या दिवशी मी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांचा आशिर्वाद घेतला होता. मात्र, त्यांनी आपल्याबद्दल असं बोलायला नको होतं अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 09:18 PM IST

ताज्या बातम्या