मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, गुलाबराव पाटलांनी फटकारले

नारायण राणे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, गुलाबराव पाटलांनी फटकारले

नारायण राणे हे शिवसेनेत असताना मुख्यमंत्री होते. शिवसेनेनं त्यांना खूप काही दिले आहे. पण, त्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही.

    राजेश भागवत, प्रतिनिधी जळगाव, 09 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. 'भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांना आता कोणतेही काम उरले नाही. त्यांच्या पक्षातही त्यांना काही काम दिले जात नाही. त्यामुळे ते एक सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत' असा सणसणीत टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी नाणार प्रकल्पावरुनही सेनेवर टीका केली होती. नाणार प्रकल्प हा शिवसेनेच्या कमवण्याचे साधन आहे, अशी टीका राणेंनी केली होती. त्यांच्या या टीकेचा समाचार घेत गुलाबराव पाटलांनी पलटवार केला. 'नारायण राणे हे शिवसेनेत असताना मुख्यमंत्री होते. शिवसेनेनं त्यांना खूप काही दिले आहे. पण, त्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी कोकणासाठी कुणी काय केले, यावर तर बोलूच नये,निव्वळ प्रसिद्धीसाठी ते वक्तव्य करत असता असा टोलाही पाटलांनी लगावला. साताऱ्यात राजकीय वारे बदलले,पवारांच्या भेटीला शिवेंद्रराजे आले तर उदयनराजे... बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला आहे. कर्नाटक सरकारच्या या कृत्याचा गुलाबराव पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. 'शिवाजी महाराजांचा पुतळा काढला पण ते मनातून शिवाजी महाराज दूर करू शकत नाही. या जगामध्ये सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हलवून त्यांनी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. छत्रपती दिल्लीला जाऊन जर समोरच्याला नतमस्तक करायला लावतात तर कर्नाटक किस खेत की मुली है.' अशा शब्दात पाटलांनी कर्नाटक सरकारवर टीका केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या