आरक्षणातलं उद्धव ठाकरेंना काय कळतं, नारायण राणेंचं शिवसेनेवर तोंडसुख

आरक्षणातलं उद्धव ठाकरेंना काय कळतं, नारायण राणेंचं शिवसेनेवर तोंडसुख

आरक्षणातलं उद्धव ठाकरे यांना काय कळतं, असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.

  • Share this:

चिपळून, 02 ऑगस्ट : आरक्षणातलं उद्धव ठाकरे यांना काय कळतं, असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार  नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची चिपळूण येथे जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा झाली. त्यावेळी नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर चांगलंच तोंडसुख घेतलं. शिवसेना सत्तेत असूनही मुख्यमंत्री यांना भेटत नाहीत, त्यामुळं हे काय कामाचे असं म्हणत राणे यांनी शिवसेना टोला लगावला.

VIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...

महाराष्ट्र पेटलाय, जाळपोळ होतेय हे बंद व्हायला पाहिजे या भावनेतून मुख्यमंत्र्याना मी तीनदा भेटलो. पण सत्तेत असून उद्धव ठाकरे यांनी एकदाही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही. त्यांना आरक्षणातलं काय कळतं. यांना कायदा नाही तर फक्त टक्केवारी कळते अशी टीका राणे यांनी केली आहे.

खासदार  झाल्यानंतर खासदार नारायण राणे प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. नारायण राणे या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात दोन जाहीर सभा घेणार आहेत. यातील पहिली सभा काल बुधवारी चिपळूण शहरात पार पडली. यावेळी नारायण राणे यांच्या बरोबर त्यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे व्यासपीठावर उपस्थित होते.

VIDEO : नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीची लोकांना शिवीगाळ,व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बॅनर खाली झालेल्या या सभेत नारायण राणे यांनी कोकणी माणसाने आता शिवसेनेची साथ सोडावी असं आव्हान केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि नेतृत्वाला केवळ पैशाची भाषा कळते असं म्हणाले आहेत.

तर माजी खासदार निलेश राणेयांनीही शिवसेनेला लक्ष्य करताना मुंबई- गोवा महामार्गाच काम का रखडलं आहे याचा शोध घ्या.  राजापूर  चिपळूण दरम्यानची काम या सेनेच्या आमदारांनीच वाटून घेतली आहेत. त्यामुळे रस्त्यांची अवस्था झाली असल्याचा आरोप करताना सेनेचे आमदार स्वतः ठेकेदारी करतात आणि जनतेला खड्यात घालतात असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा...

PHOTOS- 'फन्ने खाँ'च्या प्रीमियरला ग्लॅमरचा तडका!

VIDEO : शाहरूखच्या मुलीचा हाॅट अवतार, व्हिडिओ व्हायरल

VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'

 

First published: August 2, 2018, 8:27 AM IST

ताज्या बातम्या