Nandurbar ZP Election Result: भाजपने रोखला काँग्रेसचा रथ, सत्तेची चावी शिवसेनेकडे!

Nandurbar ZP Election Result: भाजपने रोखला काँग्रेसचा रथ, सत्तेची चावी शिवसेनेकडे!

नंदुरबारमध्ये एकूण 56 जागांपैकी काँग्रेसने 23 जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपनेही 23 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे नंदुबारमध्ये कोण बाजी मारणार यावर मोठा सस्पेंस आहे.

  • Share this:

निलेश पवार, प्रतिनिधी

नंदुरबार, 08 जानेवारी : राज्यातील पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या 6 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल (ZP election results ) आज जाहीर होत आहेत. या 6 जिल्ह्यांमधील नागपूर आणि पालघरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला तर नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसची चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. नंदुरबारमध्ये एकूण 56 जागांपैकी काँग्रेसने 23 जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपनेही 23 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे नंदुबारमध्ये कोण बाजी मारणार यावर मोठा सस्पेंस आहे.

खरंतर, नंदुरबार हा काँग्रेसचा गड आहे. पण यावेळी भाजपने जास्त जागा मिळवून काँग्रेसची बरोबरी केली आहे. दरम्यान, आता सत्ता आणण्यासाठी काँग्रेसला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. त्यामुळे सध्या काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर येत आहेत.

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूत लढणाऱ्या आदिवासी विकालमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेश पराडके यांनी विजयश्री खेचून आणली आहे. धडगाव तालुक्यात काँग्रेसचे चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विडयी झाले.

दरम्यान, नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने प्रथमच मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला होता. पण नागपूरप्रमाणे नंदुरबारमध्येही काँग्रेसने जास्त जागा खेचून घेतल्या. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 पैकी 56 जागांचे निकाल समोर आले आहेत. त्यात भाजप आघाडीवर आहे.

इतर बातम्या - Nagpur ZP Election Result: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, नागपूर 'भाजपमुक्त'

नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल –एकूण जागा 56

जाहीर झालेले निकाल 56

काँग्रेस 23

भाजपा 23

शिवसेना 7

राष्ट्रवादी 3

अपक्ष 0

नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. 2013 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला, मात्र 2008 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला नंदुरबार जिल्हा परिषद खेचून आणण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे.

इतर बातम्या - 10000 उंटांना थेट गोळ्या घालून ठार करणार; कारण वाचून व्हाल हैराण

2013 मधील नंदुरबार जिल्हा परिषदेचं संख्याबळ – 56

काँग्रेस – 29

राष्ट्रवादी – 25

अपक्ष – 01

भाजप – 01

शिवसेना– 00

जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी के सी पाडवी यांच्याकडे होती. त्यांची पत्नीच निवडणूक रिंगणात असल्याने ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. के सी पाडवी हे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये के सी पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात के सी पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. के. सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच के. सी. पाडवी यांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: January 8, 2020, 4:36 PM IST
Tags: nandurbar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading