Home /News /news /

नंदूरबार : परीक्षेनंतर धरणात पोहोचला गेलेले दोन विद्यार्थी बुडाले; सेल्फी घेताना घडली चूक

नंदूरबार : परीक्षेनंतर धरणात पोहोचला गेलेले दोन विद्यार्थी बुडाले; सेल्फी घेताना घडली चूक

एकूण 8 जणं धरणात पोहायला गेले होते. मात्र दोघांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाला.

    नंदुरबार, 7 जुलै : सध्या राज्यभरात नागरिकांना तुफान पावसाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाकडूनही नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. नागरिकांनी अशा पावसात कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं हवामान विभागकडून वारंवार सांगितलं जातं. त्याशिवाय मुसळधार पावसात धरण, समुद्र अशा ठिकाणी जाताना सावध राहण्याचा इशारा दिला जातो. यादरम्यान नंदूरबारमध्ये (Nandurbar News) दोन विद्यार्थ्यांचा धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणात दोन विद्यार्थ्यांचा बुडुन मृत्यू झाला आहे. मुक्तविद्यापीठाचा पेपर दिल्यानंतर हे आठ विद्यार्थी धरणात पोहण्यासाठी गेले होते. यातील दोन जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातच ही मुलं धरणात उतरुन सेल्फी घेण्यास व्यस्त होती. त्यातच दोघांचा बुडुन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती पोलिसांनी दिली आहे. राहुल सुनिल वाडके आणि कल्पेश भगवान सोनवणे अशी मृतांची नावं असून या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी (Two students drown after reaching dam after exams ) मोठा आक्रोश देखील केला. मुंबईत तुफान पाऊस... मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आज (गुरूवार) सकाळी देखील कायम आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये येत्या 3 ते 4 तास जोरदार पाऊस (Mumbai Rain Update) पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आज पहाटे साडेपाच पर्यंत कुलाबा वेधशाळेत 95.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 96.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-ठाण्यासह जवळच्या रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र ते अती तीव्र पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्याचप्रमाणे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस आगामी काही तासांंमध्ये पडेल, असे हवामान विभागानं स्पष्ट केलं. नागरिकांना बाहेर पडण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही हवामान विभागानं दिली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या