सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये महिलेची छेड... नंदुरबार रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक

सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये महिलेची छेड... नंदुरबार रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक

महिलेची छेड काढल्याप्रकरणी नंदूरबार रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे शहरात तणाव पसरला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

  • Share this:

निलेश पवार,(प्रतिनिधी)

नंदुरबार, 26 ऑगस्ट: महिलेची छेड काढल्याप्रकरणी नंदूरबार रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे शहरात तणाव पसरला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी की, सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातुन नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर जमलेल्या संतप्त जमावाने रेल्वेस्टेशन तसेच परिसरात दगडफेक केली. त्यावेळी प्लॉटफॉर्मवरुन जाणाऱ्या मालगाडीवर संतप्त जमावाकडून दगडफेड करण्यात आली. रेल्वेस्टेशनच्या लगत असणाऱ्या बादशाह नगर परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत रेल्वे कर्मचाऱ्यासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

धक्कादायक म्हणजे छेडखानी झालेल्या महिलेने अद्याप तक्रार दिलेली नाही. सदर महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या वातावरण निवळले असले तरी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. लोहमार्ग पोलिस विभागाचे भुसावळ आणि औरंगबाद येथून वरिष्ठ अधिकारी नंदूरबार येथे पोहोचले आहेत. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

VIDEO: महिलेची छेड काढल्यानं रेल्वे स्टेशनवर तुफान दगडफेक, जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 26, 2019 09:40 AM IST

ताज्या बातम्या