प्रेम प्रकरणातून मुलीची हत्या करून शेतात फेकलं, आरोपीच्या घरावर युवकांची दगडफेक

प्रेम प्रकरणातून मुलीची हत्या करून शेतात फेकलं, आरोपीच्या घरावर युवकांची दगडफेक

या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी सारंगखेडा बंद पुकारत आरोपीच्या घरावर हल्लाबोल करत तुफान दगडफेक केली आहे.

  • Share this:

निलेश पवार, नंदुरबार, 24 ऑक्टोबर : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात पंधरा वर्षीय मुलीची शुक्रवारी हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता वातावरण तापू लागलं असल्याचं चित्र दिसून येत आहे. आज या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी सारंगखेडा बंद पुकारत आरोपीच्या घरावर हल्लाबोल करत तुफान दगडफेक केली आहे.

संतप्त जमावाने आरोपीच्या घरासमोरील शेती साहित्यासह अन्य साहित्याची मोडतोड करत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमध्ये तीन ते चार गाड्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रेम प्रकरणातून काल एका मुलाने एका पंधरा वर्षीय मुलीचा गळा चिरून हत्या केली. तसंच हत्येनंतर सदर मुलीचा मृतदेह पोत्यात भरून एका उसाच्या शेतात फेकून दिला होता.

हेही वाचा - माता न तू वैरिणी...ऑनलाईन वर्गात उत्तर दिलं नाही म्हणून आईने सहावीतल्या मुलीला भोसकलं

या घटनेमुळे आदिवासी समाजाचे युवक चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. रावेरमधील 4 आदिवासी बालकांच्या हत्याकांडाला आठ ते दहा दिवस उलटत नाही तोच सारंगखेडा मधील या मुलीच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर समाजातून मोठा रोष निर्माण झाला आहे.

दरम्या,न आज या घटनेचे पडसाद सारंखेडासह परिसरात उमटले असून यामुळे या ठिकाणची बाजारपेठ संपूर्णपणे बंद होती. तसंच परिसरात तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 6:32 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या